Join us  

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:51 AM

Open in App
1 / 11

क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडूही आपापल्या देशांतील सरकारला कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलत आहेत. पण, भारत देशात माजी कर्णधार सौरव गांगुली, गौतम गंभीर आणि टेनिसपटू सानिया मिर्झा वगळता अन्य कोणी पुढे आलेलं दिसत नाही.

2 / 11

जगातील दोन अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी अनुक्रमे बार्सिलोना आणि पोर्तुगाल येथील सार्वजनिक हॉस्पिटल्सना कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येकी 8 कोटी दिले.

3 / 11

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने आणि त्याच्या पत्नीनं स्वित्झर्लंड सरकारला 7 कोटींची मदत केली.

4 / 11

इंग्लंडचे क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉड आणि हॅरी गर्नी यांनी पबचे रुपांतर किराणा दुकानात करून कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवला.

5 / 11

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानातील 200 गरजू कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तू पुरवण्यासाठी पुढाकार घेतला.

6 / 11

बीसीसीआयपेक्षा आर्थिक बाबीत कमकुवत असलेल्या श्रीलंका क्रिकेट मंडळानेही त्यांच्या सरकारला 1 कोटी मदत केली.

7 / 11

बांगलादेशच्या 27 खेळाडूंनी त्यांच्या पगाराची निम्मी रक्कम बांगलादेश सरकारला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिली आहे.

8 / 11

सानिया मिर्झानेही पुढाकार घेत रोंजदारी कामगारांच्या अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी चळवळ उभी केली आहे.

9 / 11

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं गरजूंना 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले आहेत.

10 / 11

भारतात क्रिकेट हा एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. त्यामुळे सामना कोणताही असो भारतीय मोठ्या संख्येनं स्टेडियमवर गर्दी करतातच... याच चाहत्यांच्या प्रेमामुळे क्रिकेटपटू श्रीमंत झाले. पण, कोरोना व्हायरसच्या या संकटात हेच क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे येताना दिसत नाही.

11 / 11

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यावर सोशल मीडियावर सध्या टीका होत आहे. तेंडुलकर आणि कोहली केवळ आवाहनाचे व्हिडीओ अपलोड करताना दिसत आहेत. त्यापलिकडे सरकारला निधीरुपी मदत केल्याचे वृत्त कुठेच नाही. त्यामुळे यांना डोक्यावर घेणाऱ्या क्रिकेटचाहत्यांमध्येच नाराजीचा सूर सध्या दिसत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासचिन तेंडुलकरविराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डोसौरभ गांगुलीसानिया मिर्झा