Join us  

डिसेंबरपासून झोपू शकले नाही...; चहलच्या पत्नीच्या पोस्टने तर्क-वितर्क, अखेर कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 4:23 PM

Open in App
1 / 7

भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही तिच्या डान्स व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र धनश्री नुकतीच चर्चेत आली आहे ती तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे. तसंच या पोस्टचा आधार घेत धनश्री खरंच कोणत्या दु:खात आहे की काय, याबाबतही तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले होते.

2 / 7

धनश्री वर्मा हिने आपलं दु:ख व्यक्त करणारी पोस्ट केल्याने ती आजारी आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.

3 / 7

आपल्या डान्स व्हिडीओंसाठी ओळखली जाणारी धनश्री ही एका टीव्ही शोमध्ये झळकणार आहे.

4 / 7

टीव्ही शोमध्ये धनश्रीचा पार्टनर असलेला सागर हादेखील एक प्रथितयश डान्सर आहे. याआधी तो अनुपमा या टीव्ही शोमध्येही झळकला होता.

5 / 7

धनश्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं की, डिसेंबरपासून मी झोपू शकलेली नाही. डान्स शोमध्ये व्यग्र असल्यानेच तिने असं कॅप्शन लिहिलं असण्याची शक्यता आहे.

6 / 7

धनश्री शर्मा ही 'झलक दिखला जा' या डान्स शोच्या ११ व्या सीझनमध्ये सहभाग घेत आहे.

7 / 7

दरम्यान, सरतं वर्ष युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या जोडीसाठी फारसं चांगलं ठरलं नाही. कारण चहलला अनेक क्रिकेट सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती, तर दुसरीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या. असं असलं तरीही हे कपल नेहमीच एकमेकांना प्रोत्साहन देत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

टॅग्स :युजवेंद्र चहलइन्स्टाग्राम