Join us  

सुरूवात अन् शेवटही शतकानं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 10:48 AM

Open in App
1 / 6

ओव्हल, भारत विरुद्ध इंग्लंडः कारकिर्दीतील पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावत इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकने विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम रचणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. अशी चमकदार कामगिरी करणारा कुक हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

2 / 6

ऑस्ट्रेलियाच्या रेगी डफ यांनी 1901-02च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरूद्ध 104 धावा केल्या होत्या आणि 1905साली इंग्लंडविरुद्धच त्यांनी अखेरच्या सामन्यात 146 धावा कुटल्या.

3 / 6

ऑस्ट्रेलियाच्याच बील पोन्सफोर्ड यांनी इंग्लंडविरुद्ध पहिला व अखेरचा सामना खेळला. पोन्सफोर्ड यांनी 1924-25 ला पदार्पणात 110 आणि 1934च्या ओव्हल अखेरच्या कसोटीत 266 धावा केल्या होत्या.

4 / 6

ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपेल यांनीही हा पराक्रम केला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या (1970-71) पहिल्या कसोटीत 108 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध निरोपाच्या सामन्यात त्यांनी सिडनीवर 182 धावा केल्या होत्या.

5 / 6

भारताच्या एकमेव खेळाडूने हा विक्रम केला आहे. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध (1984-85) 110 आणि निरोपाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( 1999-00) 102 धावा केल्या होत्या.

6 / 6

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकही या दिग्गजांमध्ये आला आहे. त्याने भारताविरुद्धच पदार्पण केले आणि अखेरचा सामनाही भारताविरुद्धच खेळला. 2005-06मध्ये त्याने नागपूर कसोटीत शतक झळकावले होते आणि ओव्हलवर मंगळवारी त्याने 147 धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअॅलिस्टर कुक