Join us  

टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाच्या बहिणीचा बिकिनीमध्ये कहर; शेअर केला 2023 चा पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:25 AM

Open in App
1 / 10

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहीण मालती चहरही आपल्या भावापेक्षा कमी प्रसिद्ध नाही. सुपरमॉडेल आणि अभिनेत्री मालती चहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आपल्या फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकत असते. मालती चहरने आपला 2023 मधील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2 / 10

मालतीचा हा बिकिनीमधील फोटो आहे. या फोटोला चाहत्यांनी लाईक केले आहे. मालती चहरने स्विमिंग पूलजवळ बिकिनी घातलेला आपला एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मालतीने म्हटले आहे की, 2023 चा पहिला.

3 / 10

दरम्यान, मालतीच्या या फोटोवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरची बहीण मालती चहर हिचा 'इश्क पश्मिना' नावाचा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र, मालतीचा हा पहिलाच चित्रपट नाही.

4 / 10

याआधीही तिने काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, मुख्य अभिनेत्री म्हणून मालतीचा हा पहिलाच चित्रपट आहे. मालती चहर व्यवसायाने सुपरमॉडेल आहे. मालती चहरच्या 'इश्क पश्मिना', 'दे दे प्यार दे', 'वेल्लापंती' आणि 'ए.आय. SHA:माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड सारख्या चित्रपटात दिसली आहे.

5 / 10

मालती चहरने 2017 मध्ये 'मॅनिक्योर' चित्रपटातून पदार्पण केले. तसेच, तिने 'जिनियस' आणि 'हुश' मध्येही काम केले आहे. मालती चहरने अनेक वेब सिरीज आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.

6 / 10

मालतीने अनेक सौंदर्य स्पर्धाही जिंकल्या आहेत. मालती फेमिना मिस इंडिया दिल्ली 2014 ची सेकंड रनर अप आहे. ती फेमिना मिस फोटोजेनिक आणि मिस सुडोकूचीही विजेती आहे. 2009 मध्ये तिने मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता.

7 / 10

मालती चहरचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते, पण यासोबतच ती तिचे अनेक फोटोही तिच्या कुटुंबासोबत शेअर करते.

8 / 10

मालती चहर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीची मोठी फॅन आहे. मालतीलाही क्रिकेटची खूप आवड आहे. त्याचे कारण म्हणजे दीपक चहर आणि राहुल हे दोघेही मोठे क्रिकेटपटू आहेत. लहानपणापासून मालती आपल्या भावांसोबत क्रिकेटही खेळत असल्याने तिची या खेळाकडे ओढ अधिक आहे.

9 / 10

मालती चहर 2018 च्या आयपीएल दरम्यान पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली. चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यादरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाली, त्यानंतर ती सोशल मीडियावर 'आयपीएलची मिस्ट्री गर्ल' बनली. मात्र, काही काळानंतर ती दीपक चहरची बहीण असल्याचे समोर आले. मात्र, तेव्हापासून ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे.

10 / 10

मालती चहर खूप सुंदर आहे. मॉडेलिंगच्या दुनियेत चांगले नाव कमावल्यानंतर मलातीला आता बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही नाव कमवायचे आहे. तसेच, मालती बॉलीवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

टॅग्स :दीपक चहरसेलिब्रिटी
Open in App