सूर्याच्या टिप्स, या खेळाडूंच्या साथीने इशान किशनचे 'नशीब' पालटले

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ईशान किशानने आक्रमक खेळी करत इतिहास रचला.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ईशान किशानने आक्रमक खेळी करत इतिहास रचला. गेल्या काही दिवसापासून तो फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे चर्चेतही नव्हता. 24 वर्षीय इशानने 10 व्या वनडे मध्ये इतिहास रचला आहे. 131 चंडूत 24 चौकार आणि 10 षटकार ठोकत 210 रन्स केल्या.

इशानने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, गेलने 2015 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 138 चेंडूत द्विशतक झळकावले होते. डावखुरा फलंदाज ईशान हा द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने अशी खेळी तीनदा केली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही प्रत्येकी एकदा द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे इशान किशनला हा चान्स मिळाला. याशिवाय आणखी दोन खेळाडूंच्या मदतीने त्याने हा पराक्रम केला.

'जून 2022 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी दिल्लीला पोहोचला होता. क्रिकेट प्रशिक्षक उत्तम मुझुमदार यांचा फोन वाजला आणि त्यांना आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये पोहोचण्याची विनंती करण्यात आली. फोन कॉलच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा आवडता शिष्य ईशान किशन होता. 'ईशान एनरिच नोर्किया आणि कागिसो रबाडा सारख्या गोलंदाजांच्या शॉर्ट-पिच चेंडूंना तोंड देण्याची तयारी करत होता. बाऊन्सरचा सामना करण्यासाठी तो योग्य स्थितीत ठेवण्याचा सराव करत होता. ईशान सामन्याच्या चार ते पाच दिवस आधी तो पुल शॉटचा सराव सुरू करायचा, असं मजुमदार म्हणाले.

ईशान किशनला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. इशान किशनने वयाच्या 6 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील प्रणव पांडे यांनी इशानला पाटणा येथील बिहार क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. शाळेत ईशानची क्रिकेटची आवड पाहून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. क्रिकेट खेळण्यासाठी तो पटनाहून रांचीला जायचा. ईशानची आवड पाहून त्याचे मित्र त्याला डफिनीत नावाने हाक मारायचे. इशान नेटवर 500-600 चेंडूंचा सामना करताना 200 चेंडूंवर पॉवर हिटिंगचा सराव करतो.

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापत असूनही रोहितने नवव्या क्रमांकावर येऊन आक्रमक फलंदाजी केली. मात्र, तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. तिसऱ्या वनडेत त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळाली. ईशानने या संधीचा पुरेपूर फायदा घेत इतिहास रचला. त्यानंतर रोहित शर्माने आनंद व्यक्त करत द्विशतक झळकावणाऱ्या क्लबमध्ये सामील होण्याची मजाच वेगळी असल्याचे सांगितले.

द्विशतक झळकावल्यानंतर ईशानने स्वतः सूर्यकुमार यादवबद्दल खुलासा केला आहे.'मी सूर्याभाईशी फलंदाजीसंदर्भात बोललो होतो. जर तुम्ही सामन्यापूर्वी फलंदाजीचा सराव केलात, तर क्रीजवर उतरल्यानंतर तुम्हाला चांगली खेळी करता येईल. खुद्द सूर्यकुमारने तुफानी इनिंग खेळल्यानंतर मैदानावर आपण काही वेगळे करत नसल्याचा खुलासा मीडियासमोर केला आहे. फक्त नेटवर खेळलेले शॉट्स बनवण्याचा प्रयत्न करा, असंही इशान म्हणाला.

इशानने घडवलेल्या इतिहासात विराट कोहलीचेही योगदान आहे. मैदानावर विराटने इशानला योग्य सल्ला दिला. विराटने शतक आणि द्विशतकाच्या जवळ आल्यावर माझे प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला.'फलंदाजी करताना विराट भाई मला सांगत होता की, कोणत्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळी करायची, कोणाविरुद्ध सावधपणे खेळायचे. जेव्हा मी 95 धावांवर होतो तेव्हा मला माझे शतक षटकाराने पूर्ण करायचे होते, परंतु त्याने मला तसे करण्यापासून रोखले आणि सांगितले की हे माझे पहिले शतक आहे, त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता, मला एकच शतक पूर्ण करू द्या, असंही इशान म्हणाला.