Join us  

Virat Kohli: विराट कोहलीसाठी लकी आहे दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स स्टेडियम, शतकांचा दुष्काळ संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 3:58 PM

Open in App
1 / 7

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधात तीन कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील पहिला सामना भारताने आपल्या नावे केला आहे. आता दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे.

2 / 7

हे स्टेडियम भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खूप लकी आहे. हे तेच स्टेडियम आहे, जिथे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार आहे (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी). सोमवारपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

3 / 7

टीम इंडिया हा कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 113 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाने सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला आहे.

4 / 7

हे मैदान कोहलीसाठी खूप खास आहे. विराटने येथे 2 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या बॅटने एकूण 310 धावा केल्या आहेत. कोहलीने 77.50 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. 2013 मध्ये भारतीय विराटने येथे 119 धावांची सुरेख खेळी केली होती.

5 / 7

2018 मध्ये विराटने पहिल्या डावात 54 आणि दुसऱ्या डावात 41 धावा केल्या होत्या. दरम्यान, या स्टेडियमवर सामना होत असल्यामुळे, कोहलीचा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला शतकांचा दुष्काळ संपेल, अशी आशा चाहत्यांना आहे. कोहलीला गेल्या 60 डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

6 / 7

विराटने आतापर्यंत 67 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत. जोहान्सबर्ग कसोटी जिंकून विराट ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज स्टीव्ह वॉच्या विक्रमाची(41 कसोटी) बरोबरी करेल. ही कामगिरी करण्यात कोहलीला यश आले तर तो कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

7 / 7

सेंच्युरियन येथे कसोटी सामना जिंकणारा कोहली हा पहिला आशियाई कर्णधार आहे. गेल्या आठवड्यात भारताने सेंच्युरियन येथे पहिल्यांदाच यजमानांना कसोटीत पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याचा कोहलीचा डोळा आहे. भारताने वांडरर्स येथे 5 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका
Open in App