Cricket Buzz»फोटो गॅलरी »सौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर भारी पडतेय क्रिकेटपटूची लेक; पाक खेळाडूंकडून मिळालेली वाईट वागणूकसौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर भारी पडतेय क्रिकेटपटूची लेक; पाक खेळाडूंकडून मिळालेली वाईट वागणूक By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:58 PMOpen in App1 / 13क्रिकेटच्या सामन्यांचे प्रक्षेपण सुरू झाल्यापासून यात ग्लॅमरसपण येऊ लागले. त्यामुळे क्रिकेट हे केवळ खेळ राहिले नाही, तर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूड हातात हात घालून चालताना दिसतात.2 / 13या ग्लॅमरमुळे महिला अँकर्सनाही त्यांच्यातील क्रिकेट ज्ञान जगासमोर मांडता आहे. भारतात अशा अनेक महिला अँकर आहेत,पण मयांती लँगर हे त्यापैकी एक नावाजलेलं व्यक्तीमत्व. कोणत्याही क्षेत्रात महिलांनी पाय टाकला की तेथे थोड्या अधिक प्रमाणात विरोध हा होतोच...3 / 13आज आपण क्रिकेट एक्स्पर्ट अँकर ( स्पोर्ट्स प्रेझेंटर) बाबत चर्चा करणार आहोत. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागाला. ब्युटी विथ ब्रेन हे समीकरण तिच्याबाबतीत तंतोतंत खरे ठरते. 4 / 13तिच्या सौंदर्याची चर्चा तर होतेच, परंतु यावेळी तिनं कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेल्या अनुभवाचा खुलासा करताना पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून मिळालेल्या वागणुकीवर भाष्य केलं. 5 / 13पाकिस्तानचे माजी स्थानिक क्रिकेटपटू नसीर अब्बास यांची मुलगी जैनब अब्बास हिनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला.6 / 1314 फेब्रुवारी 1988मध्ये जन्मलेल्या जैनबनं मेक अप आर्टिस्ट म्हणून अभ्यास पूर्ण केलं. पण, आता ती जगभरात स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून ओळखली जाते.7 / 13लहानपणापासूनच क्रिकेटला जवळून पाहिल्यानं तिचं या खेळाशी घट्ट नातं जोडलं गेलं. त्यामुळेच इंग्लंडमध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर तिनं स्पोर्ट्स प्रेझेंटर होण्याचा निर्णय घेतला.8 / 13जैनबनं गतवर्षी लाहोर येथे हमजा करदार याच्याशी विवाह केला. त्याचे आजोबा पाकिस्तान क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. 9 / 13गतवर्षी तिनं आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा होस्ट केली आणि अशी कामगिरी करणारी ती पाकिस्तानची पहिली महिला प्रेझेंटर ठरली. तेव्हा तिच्या सौंदर्याची फार चर्चा रंगली होती.10 / 13पण, तिचा इथवरचा प्रवास हा सोपा नक्की नव्हता. कारकिर्दीच्या सुरूवातीला तिला पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून सन्मानजनक वागणुक मिळाली नव्हती. 11 / 13महिला असल्यानं पाकिस्तानी खेळाडू तिच्यासोबत कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकार द्यायचे, असा खुलासा तिनं केलं.12 / 13तिनं सांगितले, पाकिस्तानात महिला क्रीडा पत्रकार होणं सोपी गोष्ट नव्हती. महिला असल्यानं क्रिकेटपटू माझ्यासोबत नीट बोलायचेही नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. 13 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications