Cricket Buzz»फोटो गॅलरी »क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ?क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 4:11 PMOpen in App1 / 11भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्रिकेट मालिकेत यजमानांनी धुमाकूळ घातला आहे. कसोटी व वन डे मालिकेपाठोपाठ संघाने ट्वेंटी-20 मालिकेतही विजयी आघाडी घेताना भारतीयांना दिवाळी भेट दिली. याच दिवाळीच्या सणात क्रिकेटपटूंच्या नावाने फटाके बाजारात आले, तर कोणत्या खेळाडूला कोणत्या फटाक्याची नाव मिळेल? चला आपण जाणून घेऊया...2 / 11रोहित शर्मा (5000 ची माळ) : जगातील सर्वात घातकी सलामीवीर म्हणून ओळखला जातो. एकदा त्याच्या बॅटीतून धावांचा ओघ सुरू झाला की तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वाहूनच घेऊन जातो.3 / 11शिखर धवन (पाऊस) : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्टायलिश फलंदाज म्हणून शिखर धवनची ओळख. पावसासारखा हळुहळू पेट घेत तो मोठा धमाका करण्याची त्यात क्षमता आहे.4 / 11महेंद्रसिंग धोनी ( रॉकेट) : महेंद्रसिंग धोनीचा षटकार हा पाहातच राहावा असा असतो. त्याने मारलेल्या फटक्यावर चेंडू एखाद्या रॉकेटप्रमाणे सीमारेषेपार जातो..5 / 11विराट कोहली ( आतषबाजी करणारा फटाका) :क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो विराट कोहलीची बॅट तळपली की प्रतिस्पर्धी संघाकडे हतबल होऊन पाहत राहण्याकडे काहीच राहत नाही. विराटची फटकेबाजी म्हणजे चाहत्यांसाठी फटाक्यांची आतषबाजीच...6 / 11सचिन तेंडुलकर ( पेन्सील टॉर्च) : क्रिकेटचा देव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचे आजही तितकेच फॅन्स आहेत. पेन्सील टॉर्चप्रामणे तो आजही चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.7 / 11राहुल द्रविड ( फुलबाजा) : ज्यांना क्रिकेटबद्दल जाण नाही त्यांनाही राहुल द्रविडने प्रेमात पाडले आहे. कोणत्याही वयोगटातील चाहत्यांना आवडावा अस द्रविड आहे.8 / 11युवराज सिंग ( पाऊस बॉम्ब ) : भारतीय संघातील यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराज सिंग ओळखला जातो. त्याने 2007च्या विश्वचषक स्पर्धेतील त्याची एका षटकातील सहा षटकारांची आतषबाजी असो किंवा आणखी अन्य स्फोटक खेळी.. युवी पाऊस बॉम्बसारखा आहे.9 / 11हार्दिक पांड्या ( रंगीबेरंगी काडीपेट्या) : मैदानावरील कामगिरीबरोबर विविध स्टाईल्समुळे हार्दिक पांड्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 10 / 11जस्प्रीत बुमरा ( रशी) : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जस्प्रीत बुमराने एकदा विकेट घेण्याचा सपाटा लावला की तो प्रतिस्पर्धी संघाला बेजार करून सोडतो.11 / 11कुलदीप यादव ( चक्री) : आपल्या फिरकीच्या तालावर कुलदीप यादव प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलाच नाचवतो. आणखी वाचा Subscribe to Notifications