जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन नावाने प्रसिद्ध असेलल्या रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने सोशल मीडियावर एक फोटो शअर केला आहे. त्यामध्ये रोहित शर्मा आपल्या मुलीसाठी गिफ्ट पॅक करताना दिसत आहे. रोहित सध्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे.
सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष अविस्मरणीय राहिले आहे. 2022 मध्ये सूर्यकुमारने ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. सूर्यकुमारने पत्नी देविशा शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला असून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांनी हॅप्पी फूट होम फाऊंडेशनच्या मुलांसोबत हा सण साजरा केला. यादरम्यान सचिन मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम खेळताना दिसला. तसेच मुलांना मिठाईचे वाटप केले.
भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवालने त्याच्या चिमुकल्या मुलासोबत फोटो शेअर केला आहे. मयंकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डिसेंबर आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.' मयंकने या महिन्यात एका मुलाला जन्म दिला.
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने पत्नी प्रियांका रैना आणि ख्रिसमस ट्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज शेफाली वर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ख्रिसमस ट्री सोबत फोटो शेअर केला आहे. शेफाली वर्माने Merry Christmas म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल पती पारुपल्ली कश्यप आणि सहकाऱ्यांसोबत पार्टी करताना दिसत आहे. सायनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती या क्षणांचा आनंद घेत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर मुलगी झिवासोबत फोटो शेअर केला आहे. साक्षीने ख्रिसमससाठी सजवलेल्या हॉटेलचा एक सुंदर व्हिडीओही शेअर केला आहे.