Cricket Buzz»फोटो गॅलरी »क्रिकेटपटूंच्या वेगळ्या वाटा; भारताचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू बनला पोलीस तर एकानं उडवलं विमान!क्रिकेटपटूंच्या वेगळ्या वाटा; भारताचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू बनला पोलीस तर एकानं उडवलं विमान! By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:01 AMOpen in App1 / 10ट्रॅव्हिस फ्रेंड - जिम्बाब्वेच्या या खेळाडूच्या क्रिकेट कारकीर्दिला वयाच्या २४व्या वर्षीच ब्रेक लागला. कर्णधार हीथ स्ट्रीक याच्यासोबत गेल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट यूनियनं त्याच्यासह १४ खेळाडूंनी संघातून बाहेर काढले. त्यानंतर ट्रॅव्हिस काही काळ क्रिकेट खेळला, परंतु नंतर तो पायलट झाला. तो मिडल ईस्टमध्ये गेला आणि तेथेच त्यानं पायलट बनण्याचा निर्णय घेतला. तो कतार एअरवेजमध्ये काम करू लागला. पायलट बनणारा तो पहिला जलदगती गोलंदाज आहे. 2 / 10कर्टली अँम्ब्रोस - वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज अँम्ब्रोसनं क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवली. पण, क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर घातक गोलंदाज गिटारिस्ट झाला अन् लोकांचे मनोरंजन करू लागला. त्याच्या नावानं बिग बँड ड्रेड अँड दी बाल्डहेड हा बँडही आहे. 3 / 10जॅक रसेल - इंग्लंडचा हा माजी यष्टिरक्षक-फलंदाज चित्रकारीत रंगला आहे. तो मागील ३० वर्षांपासून चित्रकार म्हणून काम करतोय. तो क्रिकेट खेळायचा तेव्हा फक्त आवड म्हणून चित्र काढायचा, परंतु त्याची ही आवड नंतर त्याचा पेशा झाला. त्यानं काढलेल्या चित्रांचे टॉवर ऑफ लंडन आणि ब्रँडमन म्युझीयममध्येही प्रदर्शन भरवण्यात आले होते.4 / 10क्रिस हॅरिस - न्यूझीलंडचा हा ऑलराऊंडर निवृत्तीनंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बनला. तो ऑर्थोपॅडिक उपकरणं विकत आहे. मुलीच्या आजारपणानंतर त्यानं हे पाऊल उचललं.5 / 10अॅलेक डगलस होम - इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री राहिलेल्या डगलस यांनी स्थानिक कौंटी क्रिकेटमध्ये मिडिलसेक्स क्लबचे प्रतिनिधित्व केलं आहे. १९६३ ते ६४ या कालावधीत ते इंग्लंडचे प्रधानमंत्री होते.6 / 10जाफर अन्सारी - इंग्लंडच्या या माजी खेळाडूंनं वयाच्या २५व्या वर्षी निवृत्ती घेतली. वकील बनण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला. त्यानं कँब्रिज युनिव्हर्सिटीतून पदवी घेतली. त्यानं इंग्लंडकडून तीन कसोटी व एक वन डे सामना खेळला.7 / 10इजाबेल वेस्टबरी - या महिला क्रिकेटपटूनं नेदरलँड्सकडून एक वन डे सामना खेळला. त्यानंतर तिनं निवृत्ती घेतली आणि पत्रकार बनली. 8 / 10जोगिंदर शर्मा - २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा हा गोलंदाज पोलिसात भर्ती झाला. तो हरयाणा पोलिसांत काम करतो. 9 / 10सलील अंकोला - भारताचा माजी गोलंदाज सलिल अंकोला २० वन डे व १ कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्याला फक्त ७ चित्रपटांत संधी मिळाली. 10 / 10अँड्य्रू फ्लिंटॉफ - इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०००हून अधिक धावा अन् ४०० हून अधिक विकेट्स घेणारा हा ऑलराऊंडर निवृत्तीनंतर प्रोफेशनल बॉक्सर बनला. आणखी वाचा Subscribe to Notifications