Join us  

Cricketers Wife: सौंदर्याच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात या क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 9:29 PM

Open in App
1 / 8

बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. त्यांच्या सुंदर फोटोही पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेटपटूंच्या पत्नींबाबत सांगणार आहोत ज्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

2 / 8

अॅडन मार्करम धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची पत्नीसुद्धा खूप सुंदर आहे. तसेच ती नेहमी चर्चेत असते.

3 / 8

महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीचं नाव साक्षी धोनी आहे. दोघांना एक मुलगी आहे. तिचं नाव जिवा आहे. साक्षी धोनी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

4 / 8

रोहित शर्माच्या पत्नीचं नाव रितिका सजदेह आहे. या दोघांचीही लव्हस्टोरी खूप चर्चेत होती. रितिका रोहित शर्माच इव्हेंट मॅनेजर होती. त्यांनी १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केलं होतं.

5 / 8

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने २०२० मध्ये सर्बियाई मॉडेल नताशा स्टँकोविक हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्या आहे.

6 / 8

लोकेश राहुलचं लग्न बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याशी झालं आहे. लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी हे २३ जानेवारी २०२३ रोजी विवाह बंधनात अडकले होते.

7 / 8

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या पत्नीचं नाव इमारी विसेर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी तिच्या हॉटनेससाठी चर्चेत असते. तिला दोन मुली आहेत. तरीही इमारी खूप हॉट दिसते.

8 / 8

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या पत्नीचं नाव चारुलता आहे. ती त्याची कॉलेजमधील गर्लफ्रेंड राहिलेली आहे. मात्र दोघांच्या लव्हस्टोरीबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. चारुलता कुठल्याही सुंदरीपेक्षा कमी नाही आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीआयपीएल २०२२हार्दिक पांड्यासंजू सॅमसन
Open in App