टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अजूनही क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. यंदाच्या हंगामात त्याच्या खेळावर टीका होत असतानाच त्याने लखनौविरूद्ध मॅचविनिंग खेळी केली.
वयाच्या ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनी हा एक मोठा ब्रँड आहे. मैदानात तो जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा, त्या क्षणाने संपूर्ण स्टेडियम दुमदुमून जाते. कारण आजही त्याचे लाखो करोडो चाहते आहेत.
२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. पण कमाईच्या बाबतीत तो अजूनही अनेक स्टार खेळाडूंना जोरदार टक्कर देतोय हे जगजाहीर आहे.
धोनीची एकूण संपत्ती १००० कोटींपेक्षा जास्त आहे. वर्षभर धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो. पण क्रिकेटपासून दूर राहूनदेखील धोनी नावाचा ब्रँड वर्षाला करोडो रुपयांची कमाई करून दाखवतो.
एमएस धोनीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते. धोनी केवळ खेळातूनच नाही तर गुंतवणूक, व्यवसाय आणि जाहिराती अशा विविध मार्गाने कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
धोनीच्या कमाईचा एक मोठा भाग ब्रँड एंडोर्समेंट आहे. तो शेतीचा व्यवसायही करतो. याशिवाय तो Seven नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील चालवतो. अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्येही त्याची गुंतवणूक आहे.
धोनीचे रांचीमध्ये माही रेसिडेन्सी हे आलिशान हॉटेल आहे. याशिवाय त्याने एका चॉकलेट कंपनीतही गुंतवणूक केली असून इतर अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्याने यथायोग्य गुंतवणूक केलेली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीची एकूण संपत्ती म्हणजेच नेटवर्थ सुमारे १०४० कोटी रुपये आहे. यावेळी आयपीएलमध्ये त्याचा पगार फक्त ४ कोटी रुपये आहे. पण याआधी त्याने या लीगमधून खूप पैसे कमवले आहेत.
तो २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि आतापर्यंत त्याने १९२ कोटी रुपये पगार म्हणून कमावले आहेत. तो कोट्यवधी रुपयांच्या घरांचा मालकही आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटसाठी ४ ते ६ कोटी रुपये घेतो.
रांचीमध्ये त्याचे 'कैलाशपती फार्म हाऊस' नावाचे फार्म हाऊस आहे. ते ७ एकरमध्ये पसरलेले आहे. याशिवाय त्यांची मुंबई, पुणे आणि डेहराडून या महागड्या शहरांमध्येही आलिशान घरे आहेत.
तसेच, तो वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांचा मालक देखील आहे. तो चेन्नईस्थित फुटबॉल क्लब चेन्नईयिन एफसी, रांचीस्थित हॉकी क्लब रांची रेंजेस आणि सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप टीम माही रेसिंग टीम इंडियाचा सह-मालक आहे.