Join us  

CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 11:48 PM

Open in App
1 / 9

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) शनिवारी CSKला पराभवाचा धक्का देताना अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना Play Off मधील स्थान जवळपास पक्के केले आहे.

2 / 9

तेच दुसरीकडे CSKला आता उर्वरित पाचही सामने जिंकून अन्य संघांच्या नेट रनरेटवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. शिखर धवननं ( Shikhar Dhawan) नाबाद शतकी खेळी करताना दिल्लीला विजय मिळवून दिला.

3 / 9

CSKच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर #Bravo ट्रेंड होऊ लागले. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) अखेरचं षटक ड्वेन ब्राव्होला का दिले नाही? यावरून धोनीला ट्रोल केले गेले. अखेरीस धोनीनं या मागचं खरं कारण सांगितले.

4 / 9

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस ( ५८), अंबाती रायुडू ( ४५), शेन वॉटसन ( ३६) आणि रवींद्र जडेजा ( ३३*) यांनी चेन्नईला ४ बाद १७९ धावा करून दिल्या. अॅनरिच नॉर्ट्झेनं दोन विकेट्स घेतल्या.

5 / 9

प्रत्युत्तरात DCची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे ( ८) पुन्हा एकदा अपयशी ठरला, चहरनं त्यालाही माघारी पाठवले. शिखर धवनचे झेल सोडणे इतके महागात पडतील याचा विचार चेन्नईनंही केला नसावा.

6 / 9

अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना अक्षर पटेलनं तीन खणखणीत षटकार खेचले आणि दिल्लीचा विजय पक्का केला. दिल्लीनं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. धवन ५८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर पटेलनं ५ चेंडूंत ३ षटकार खेचून २१ धावा केल्या.

7 / 9

ब्राव्होनं ३ षटकांत २३ धावा देताना १ विकेट घेतली, तरीही त्याला अखेरचं षटक न दिल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

8 / 9

६ चेंडू १७ धावा, तरीही रवींद्र जडेजा का?

9 / 9

महेंद्रसिंग धोनीनं सांगितलं की,''ड्वेन ब्राव्हो तंदुरुस्त नव्हता. त्यानं मैदान सोडले तो परत आलाच नाही. त्यामुळे अखेरच्या षटकात माझ्यासमोर कर्ण शर्मा किंवा रवींद्र जडेजा हे दोनच पर्याय होते आणि मी जडेजाची निवड केली. शिखर धवनची विकेट महत्त्वाची होती, परंतु आम्ही त्याचे अनेक झेल सोडले. हे सांगून मला शिखरच्या खेळीचं महत्त्व कमी करायचे नाही.''

टॅग्स :IPL 2020ड्वेन ब्राव्होमहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सशिखर धवनदिल्ली कॅपिटल्स