Join us  

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला...

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 6:29 PM

Open in App
1 / 9

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला.

2 / 9

CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला.

3 / 9

रोहित शर्माला बाद करून पीयूष चावलानं MIला मोठा धक्का दिला. या सामन्यानंतर कर्णधार MS Dhoniनं खेळाडूंचे कौतुक करताना येथील व्यवस्था पाहणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक केले. ते करत असताना त्यानं अप्रत्यक्षपणे सुरेश रैनाचे कान टोचले.

4 / 9

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं ( Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली.

5 / 9

वैयक्तिक कारणास्तव आपण ही माघार घेतल्याचे रैनानं सांगितले आहे, परंतु अजूनही CSK आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याच्या माघारीमागचं खरं कारण कळलेलं नाही.

6 / 9

सुरेश रैना अन् धोनी यांच्यात हॉटेल रुमवरून वाद झाल्याची चर्चा रंगली होती. त्यावर रैनानं ( Raina) असा कोणताच वाद न झाल्याचे स्पष्ट केलं. पण, धोनीच्या सामन्यानंतरच्या प्रतिक्रियेनं पुन्हा ती चर्चा रंगू लागली आहे.

7 / 9

कोरोना काळात UAE क्रिकेट बोर्डानं IPL 2020साठी केलेल्या उत्तम सोई सुविधांबाबत धोनीला विचारण्यात आले.

8 / 9

तेव्हा तो म्हणाला,''सर्व गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी पडद्यामागे अनेक लोक झटत असतात. एका स्पर्धेसाठी शेकडो लोक काम करत आहेत. पण काही वेळा खेळाडू याचा विचार करत नाहीत आणि लगेच तक्रारी करण्यास सुरूवात करतात.''

9 / 9

धोनीच्या या विधानाचा संबंध सुरेश रैनाच्या माघारीशी लावला जात आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्समहेंद्रसिंग धोनीसुरेश रैना