CSK मोठी बोली लावण्यापेक्षा स्वस्तात मस्त डील करणारा संघ; या लिलावातही दिसला तोच पॅटर्न

चेन्नई सुपर किंग्सचा संघ लिलावात मोठी बोली लावण्यापेक्षा स्वस्तात मस्त डील करण्यासाठी ओळखला जातो.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ लिलावात मोठी बोली लावण्यापेक्षा स्वस्तात मस्त डील करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावातही संघाने तोच पॅटर्न अवलंबल्याचे दिसून आले.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात २०२३ मध्ये बेन स्टोक्स (१६ कोटी ५० लाख) वर त्यांनी विक्रमी बोली लावली होती. त्याआधी २०२४ मध्ये डॅरियल मिचेल आणि २०२२ मध्ये दीपक चहरसाठी प्रत्येकी १४ कोटींची बोली लावल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी हा विक्रम कायम राहिला. CSK च्या ताफ्यातील सर्वात महागड्या खेळाडूची डील त्यांनी १० लाख रुपयांत केली. एक नजर CSK च्या ताफ्यातील महागड्या खेळाडूंसह आगामी हंगामासाठी केलेल्या संघ बांधणीवर

नूर अहमद या अफगाणिस्तानच्या खेळाडूसाठी CSK नं १० कोटी रुपये मोजले. तो यंदाच्या लिलावातील संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

रविचंद्रन अश्विनलाही चेन्नईनं आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी CSK च्या संघानं ९ कोटी ७५ लाख एवढी रक्कम मोजलीये.

न्यूझीलंडचा स्टार डेवॉन कॉन्वे पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे. त्याच्यासाठी संघाने लिलावात ६ कोटी २५ लाख एवढी रक्कमखर्च केली.

भारतीय जलदगती गोलंदाज खलील अहमद ४ कोटी ८० लाख रुपयांसह चेन्नईचा झालाय.

न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्र ४ कोटीसह पुन्हा CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसेल.

रणजी क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई सुपर किंग्सनं आश्चर्यकारक किंमत मोजली. ३ कोटी ४० लाख रुपयांसह CSK नं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

पुणेकर राहुल त्रिपाठीसाठी CSK च्या संघानं लिलावात ३ कोटी ४० लाख रुपये मोजले.

इंग्लंडचा समॅ कुरेन २ कोटीसह चेन्नईच्या ताफ्यात सामील झालाय.

दीपक हुड्डावर CSK च्या संघाने १ कोटी ७० लाख रुपयांचा डाव खेळला आहे.

जेमी ओव्हरटन हा आणखी एक खेळाडू आहे जो मूळ किंमत १ कोटी ५० लाखांसह चेन्नईच्या ताफ्यात सहभागी झालाय.

नॅथन एलिसला मूळ किंमतीपेक्षा ७५ लाख अधिक देत चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतले आहे.

आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी असा आहे CSK चा संघ