Cute Family! अजिंक्य रहाणेच्या लेकरांचे 'गोड' फोटो, राधिकाने विचारला मजेशीर प्रश्न

Ajinkya Rahane family अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने तिच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत आणि मजेशीर प्रश्न विचारला आहे.

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या घरी काही महिन्यांपूर्वी गोड बाळाने जन्म घेतले

अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने तिच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत

राधिकाने त्यांच्या मुलांचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांना मजेशीर प्रश्न विचारला आहे. तिने दोन्ही मुलांचे बापलणीचे फोटो एकत्रित पोस्ट केले आणि कोण चांगलं डोळे वटारतंय असा प्रश्न विचारला

अजिंक्य-राधिकाला पहिली मुलगी आहे, तिचे नाव आर्या असे आहे. लहान मुलाचे नाव राघव ठेवण्यात आले आहे

आर्याचा जन्म हा ५ ऑक्टोबर २०१९ मधला आणि राघवचा जन्म ५ ऑक्टोबर २०२२ मधला

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलीवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे

अजिंक्य -राधिका हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली.

या दोघांमधील प्रेम घरच्यांना न सांगता कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले.

या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले होते.

अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघाबाहेर आहे आणि त्याने रणजी करंडक स्पर्धेत कालच आसामविरुद्ध १९१ धावा चोपल्या.