Join us

'डेव्हिड माझं ऐकत असशील तर.... IPL खेळायला येऊ नकोस'; DCच्या तिसऱ्या पराभवानंतर ऑसी खेळाडूला दिग्गजाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 16:15 IST

Open in App
1 / 7

दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि ते गुणतालिकेत तळावर आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात २०० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीला १४२ धावाच करता आल्या.

2 / 7

DCला ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्याचा त्यांच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम होणार आहे. दिल्लीच्या या पराभवानंतर माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग व रोहन गावस्कर यांनी दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याच्यावर टीका केलीय. या सामन्यात वॉर्नरने ५५ चेंडूंत ६५ धावा केल्या.

3 / 7

ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व मनिष पांडे यांना सलग चेंडूंवर माघारी पाठवले. रिली सोसू पुन्हा एकदा मोठी खेळी करणअयात अपयशी ठरला. वॉर्नर आणि ललित यादव यांनी ६४ धावांची भागीदारी केली, परंतु त्यांचा खेळ संथ होता. त्यामुळे दिल्लीवर दडपण वाढत गेले अन् फलंदाजांनी विकेट फेकल्या.

4 / 7

या सामन्यात वॉर्नरने आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला. पण, दिल्लीला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. वॉर्नरची संथ खेळी पाहून वीरू भडकला अन् त्याला एक सल्ला दिला. त्याने यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिक असे वॉर्नरला म्हटले.

5 / 7

''वॉर्नरला इंग्रजीत समजावण्याची वेळ आलीय आणि मला हे सांगताना आनंद नक्कीच होत नाहीए. डेव्हिड जर तू ऐकत असशील तर कृपया चांगला खेळ. २५ चेंडूंत ५० धावा कर. जैस्वालने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले, त्याच्याकडून शिक. जर तुला हे जमत नसेल, तर तू इथे आयपीएल खेळायला येऊ नकोस,''असे वीरू म्हणाला.

6 / 7

वीरूने पुढे म्हटले की,''डेव्हिड वॉर्नर ५५-६० धावा करण्याऐवजी ३० धावा करून बाद झाला, तर ते संघाच्या हिताचे ठरेल. रोव्हमन पॉवेल आणि इशान पोरेल आदी खेळाडूंना लवकर फलंदाजीला यायला मिळेल आणि कदाचीत ते चांगली कामगिरी करतील. या खेळाडूंना खेळण्यासाठी चेंडूच उरत नाहीत. ते बिग हिटर आहेत.''

7 / 7

रोहन गावस्कर म्हणाला, तू ८ चेंडूंत ८ धावा करून बाद झालास तर ते ठिक आहे. त्याला लय सापडत नाहीए. त्याच्याकडे अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद ६००० धावा केल्या आहेत आणि म्हणून त्याच्याकडून असा खेळ अपेक्षित नाही.''

टॅग्स :आयपीएल २०२३डेव्हिड वॉर्नरदिल्ली कॅपिटल्सविरेंद्र सेहवाग
Open in App