अजब लव्ह स्टोरी; 'टॉयलेट प्रकरणा'मुळे डेव्हिड वॉर्नरची पत्नी आलेली चर्चेत!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाची आयरन वुमन कँडीस यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली.

वॉर्नरने 4 एप्रिल 2015मध्ये कँडीससोबत लग्न केले. वॉर्नर आणि कँडीस यांची लव्ह स्टोरी थोडी वेगळी आहे.

2018मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी लागली. चेंडू कुरतडण्या प्रकरणी वॉर्नरच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता. पण, याच काळात वॉर्नर आणि कँडीस यांच्यातीन नातं मजबूत झाले.

वॉर्नर आणि कँडीस यांचं प्रेम हे सोशल मीडियावरून जमलं होतं. त्यात लग्नापूर्वीच वॉर्नर एका मुलीचा बाप झाला होता आणि पत्नीच्या टॉयलेट प्रकरणामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदीही लागली होती.

ट्विटरवर हे दोघं भेटले. अॅशेज मालिका खेळण्यासाठी वॉर्नर इंग्लंडमध्ये गेला आणि त्याचवेळी एका घटनेनंतर कँडीसनं वॉर्नरला ट्विटरवरून मॅसेज केला.

त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरू झाले आणि त्याचे रुपांतर स्काईप कॉलमध्ये झाले. सुरुवातीला हे दोघंही प्रेमप्रकणात गंभीर नव्हते. पण, हळुहळु दोघांचं प्रेम वाढत गेले.

डेली मेलला दिलेल्या एका मुलाखतीत वॉर्नरने सांगितले की, वर्षभरात वॉर्नर बाप झाला होता. कँडीसनं मुलगी इव्हाला जन्म दिला आणि त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरला आता तीन मुली आहेत.

2018मध्ये वॉर्नरच्या कारकिर्दीला झटका लागला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी वॉर्नरसोबत हुज्जत घातली होती आणि तेव्हा वॉर्नरसमोर त्यांनी टॉयलेट प्रकणाचा उल्लेख केला. त्यामुळे वॉर्नर भडकला.

त्यानंतर केप टाऊन कसोटीत बॉल टॅम्परींग प्रकरण केले. त्यानंतर वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर एका वर्षांची, तर कॅमेरून बँनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

टॉयलेट प्रकरण हे वॉर्नरच्या पत्नीशी निगडीत आहे. लग्नापूर्वी कँडीसचे नाव सोनी बिल विलियन्ससोबत जोडले गेले आणि त्याच्यासोबतचा तिचा एक व्हिडीओ खुप व्हायरल झाला होता.तेव्हा कँडीसनं तेव्हा नशेत चुकीचं पाऊल उचलल्याचा खुलासा केला.