Join us  

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 4:05 PM

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं ( Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली.

2 / 10

वैयक्तिक कारणास्तव आपण ही माघार घेतल्याचे रैनानं सांगितले आहे, परंतु अजूनही CSK आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याच्या माघारीमागचं खरं कारण कळलेलं नाही. मायदेशात परतल्यानंतर रैनानं पुन्हा आयपीएलमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्याला परवानगी मिळणार की नाही, याबाबतचा निर्णय BCCI घेईल.

3 / 10

मात्र, आता रैनाच्या जागी बदली खेळाडूला ताफ्यात घेण्याच्या हालचाली CSKनं सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. IPL मध्ये रैनाच्या नावावर IPLमध्ये एका शतकाचा समावेश आहे. त्यानं 193 सामन्यांत 33.34च्या सरासरीनं 5368 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 38 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 10

त्याच्या नावावर 493 चौकार व 194 षटकारही आहेत आणि त्यानं 101 झेलही टिपले आहेत. शिवाय त्याच्या नावावर 25 विकेट्सही आहेत. असा हा अष्टपैलू खेळाडू गमावल्यानं CSKला नक्कीच मोठा धक्का बसेल.

5 / 10

पण, आता जगातील नंबर वन खेळाडू CSKच्या ताफ्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

6 / 10

Inside Sportच्या वृत्तानुसार जागतिक ट्वेंटी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या डेव्हिड मलानला आपल्या संघात घेण्यासाठी CSKनं हालचाली सुरू केल्या आहेत.

7 / 10

''ही प्राथमिक चर्चा आहे, अजून अंतिम निर्णय झालेला नाही. ट्वेंटी-20 फॉरमॅटमधील मलान हा दमदार फलंदाज आहे. रैनासारखा तोही डावखुरा आहे, परंतु संघ व्यवस्थापनानं अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. रैनाला रिप्लेस करायचे की नाही, हे अद्याप ठरलेलं नाही,''असे Inside Sportला CSKच्या सूत्रांनी सांगितले.

8 / 10

इंग्लंडच्या मलाननं नुकतंच आयसीसी ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले. इंग्लंडकडून 16 ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 48.71च्या सरासरीनं 682 धावा केल्या आहेत. त्यात एका शतकासह 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

9 / 10

दरम्यान, ANIशी बोलताना CSK चे CEO कासी विश्वनाथन यांनी मलानला ताफ्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. CSKतील परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे मलान संघात येऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

10 / 10

नियमानुसार प्रत्येक संघ 8 परदेशी व 17 भारतीय खेळाडू अशा 24 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेऊ शकतात.CSKकडे शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर, जोश हेझलवूड, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन हे परदेशी खेळाडू आहेत.

टॅग्स :आयपीएल 2020सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सइंग्लंड