Cricket Buzz»फोटो गॅलरी »On This Day : रोहित शर्मानं साकारली इतिहासानं साक्ष ठेवावी अशी खेळी; कोलकातात झालेला विक्रम मोडणे अशक्यOn This Day : रोहित शर्मानं साकारली इतिहासानं साक्ष ठेवावी अशी खेळी; कोलकातात झालेला विक्रम मोडणे अशक्य By स्वदेश घाणेकर | Published: November 13, 2020 3:00 PMOpen in App1 / 10भारतीय संघाचा सलामीवर रोहित शर्मानं नुकतंच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) विक्रमी पाचव्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं.2 / 10कर्णधार म्हणून सर्वाधिक पाच जेतेपद पटकावणारा रोहित हा आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. शिवाय रोहितच्या नावावर सर्वाधिक ६ आयपीएल जेतेपदं आहेत. पण, रोहित हा केवळ आयपीएलपुरता मर्यादित राहणारा फलंदाज नाही.3 / 10रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटही तितक्याच ताकदीनं गाजवलं आहे. म्हणून जग त्याला हिटमॅन या नावानं ओळखतं. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2 द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. शिवाय त्यानं ८वेळा १५०+ धावा चोपल्या आहेत.4 / 10२०१३मध्ये रोहितनं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील त्याचे पहिले द्विशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू वन डे सामन्यात त्यानं २०९ धावांची खेळी केली होती. 5 / 10त्यानंतर त्यां २०१४ व २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यानं द्विशतक झळकावले होते. यापैकी २०१४च्या द्विशतकाचा विक्रम कोणाला मोडणे शक्य होईल असे वाटत नाही.6 / 10१३ नोव्हेंबर २०१४मध्ये आजच्याच दिवशी कोलकाताच्या इडन गार्डनवर रोहितच्या बॅटीनं लंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती.7 / 10श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यात रोहितनं १७३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकार खेचले होते. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 8 / 10रोहितच्या या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ४०४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४३.१ षटकांत २५१ धावांत तंबूत परतला.9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications