लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखालील पहिल्याच सामन्यात KXIPच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) DCला धक्के दिले, त्यात पदार्पणवीर रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi) याने DCच्या फलंदाजांना मोठे फटके मारू दिले नाही. पण, मार्कस स्टॉयनिसनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना DCला समाधानकारक पल्ला गाठून दिला.