Join us  

DC vs KXIP Latest News : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 7:45 AM

Open in App
1 / 12

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा ( Super Over ) थरार अनुभवायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात आज झालेल्या सामन्यात चाहत्यांना नाट्यम निकाल पाहायला मिळाला.

2 / 12

157 धावांचा पाठलाग करताना KXIPचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु मायंक अग्रवालनं ( Mayank Agarwal) तुफानी फटकेबाजी करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत KXIPला 8 बाद 157 धावांवर रोखले.

3 / 12

विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली. पण, आता एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयावरून वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनी खराब अंपायरिंगचे वाभाडे काढले.

4 / 12

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात साजेशी झाली नाही. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) सुरुवातीला धक्के देत दिल्लीची अवस्था 3 बाद 13 अशी केली.

5 / 12

त्यानंतर श्रेयस अय्यर ( 39), रिषभ पंत ( 31) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ही दोघं माघारी परतल्यानंतर दिल्लीची पुन्हा घसरगुंडी झाली.

6 / 12

मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला 8 बाद 157 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानं ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या 20 व्या षटकात 30 धावा चोपल्या. स्टॉयनिसनं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 53 धावांची खेळी केली.

7 / 12

KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले.

8 / 12

कृष्णप्पा गोवथम आणि मयांक यांनी सहाव्या विकेटसाठी साजेशी भागीदारी केली. 16व्या षटकात कागिसो रबाडानं ही जोडी तोडली. गोवथम 20 धावांवर माघारी परतला. मयांकनं एका बाजूनं संयमी खेळी करताना वैयक्तिक अर्धशतकासह पंजाबच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या.

9 / 12

मोहित शर्मानं टाकलेल्या 18 व्या षटकात 17 धावा चोपल्या. मयांकची ही फटकेबाजी 19व्या षटकातही कायम राहिली. 6 चेंडूंत 13 धावांची गरज असताना मयांकनं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही.

10 / 12

पण, 19व्या षटकात पंचानी दिलेला एक निर्णय KXIP पंजाबच्या पराभवाला कारण ठरला. 19व्या षटकाच्यात पाचव्या चेंडूवर अग्रवाल आणि ख्रिस जॉर्डन यांनी तीन धावा धावून काढल्या. परंतु, पंचांनी एक शॉर्ट धाव असल्याचे जाहीर केले आणि ही एक धाव KXIPला महागात पडली.

11 / 12

पंचांच्या या निर्णयावरून इरफान पठाणनं सवाल उपस्थित केला,तर वीरूनं त्याच्या शैलीत फटकेबाजी केली.

12 / 12

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्सविरेंद्र सेहवागइरफान पठाण