Join us  

बाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही!

By स्वदेश घाणेकर | Published: September 29, 2020 9:59 PM

Open in App
1 / 9

सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघ Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या लढतीत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहेत.

2 / 9

डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) नेतृत्वाखालील SRH संघ स्पर्धेत विजयाची चव न चाखलेला एकमेव संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयासाठी वॉर्नर अँड टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न झालेले पाहायला मिळाले. सावध सुरुवातीनंतर SRHने समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ केला.

3 / 9

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) SRHविरुद्ध आक्रमक रणनीती वापरली. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) हे स्फोटक फलंदाज समोर असताना DCनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये चार गोलंदाजांचा वापर केला. त्यात उत्तम क्षेत्ररक्षण लावून DCनं त्यांना मोठे फटके मारण्यापासूनही रोखलं.

4 / 9

SRHला पहिल्या 6 षटकांत 38 धावा करता आल्या, त्यापैकी 14 धावा सहाव्या षटकात आल्या. त्यानंतर SRHच्या फलंदाजांनी गिअर बदलला आणि 8च्या सरासरीनं धावा करण्यास सुरुवात केली. 10व्या षटकात अमित मिश्रानं ( Amit Mishra) DCला पहिले यश मिळवून दिले. त्यानं वॉर्नरला बाद केले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर DCनं DRS घेतला आणि त्यात वॉर्नर बाद असल्याचे स्पष्ट झाले. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या.

5 / 9

मिश्रानं पुढच्या षटकात मनीष पांडेला ( 3) बाद केले. DCच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीला लगाम लावून ठेवला होता. SRHचे चाहते ज्याची वाट पाहत होते, तो केन विलियम्सन ( Kane Williamson) याचे अखेर IPL 2020त पदार्पण झाले. केननं त्याच्या क्लासिक फटक्यांनी चाहत्यांना खुशही केले.

6 / 9

SRHनं 15 षटकांत 2 बाद 115 धावा केल्या होत्या. त्याची फटकेबाजी पाहून चाहत्यांना आनंद झाला. बेअरस्टोनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, पुढच्याच चेंडूंवर कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) त्याला बाद केलं. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला. केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या.

7 / 9

दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कागिसोनं या कामगिरीसह IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांना न जमलेला पराक्रम केला.

8 / 9

IPLमध्ये सलग दहा सामन्यांत एकापेक्षा अधिक विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानं आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2/21 अशी कामगिरी केली.

9 / 9

तत्पूर्वी, 3/26 वि. CSK, 2/28 वि. KXIP, 2/31 वि. RCB, 2/37 वि. RR, 2/23 वि. KXIP, 2/38 वि. MI, 4/22 वि. SRH, 2/42 वि. KKR, 4/21 वि. RCB अशी कामगिरी केली.

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबाद