क्रिकेटच्या मैदानात लक्षवेधी खेळी करणाऱ्या अनेक खेळाडूंना चांगल्या पगारासह प्रतिष्ठित सरकारी नोकरीची ऑफर मिळते. या खेळाडूंच्या यादीत आता दीप्ती शर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे.
भारतीय पुरुष संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजनंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघातील ऑलराउंडर दीप्ती शर्माला पोलिस उपअधीक्षक (DSP) पद बहाल करण्यात आले आहे.
दीप्ती शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वर्दीतील फोटो शेअर केले आहेत.
दीप्ती शर्माच्या या फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सची बरसात होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होताना दिसतोय.
दीप्ती शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. ती तिन्ही फॉर्मेटमध्ये संघातील नियमित सदस्य आहे.
वयाच्या १२ व्या वर्षांपासून क्रिकेट खेळणाऱ्या दीप्तीनं २०१४ मध्ये भारताकडून पदार्पणाचा सामना खेळला होता.
दीप्ती शर्मानं ५ कसोटी सान्यात ३१९ धावांसह २० विकेट्स घेतल्या आहेत.
वनडेत १०१ सामन्यानंतर तिच्या खात्यात २१५४ धावांसह १३० विकेट्सही नोंद आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १२४ सामन्यात तिने १०८६ धावांसह १३८ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.