क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची गोष्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
एकीकडे धनश्री आणि चहल यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना ते दोघे मात्र या मुद्यावर मौन बाळगून आहेत.
असे असले तरीही, सोशल मीडियावर मात्र दोघेही आपापल्या अकाऊंटवरून फोटोशूट पोस्ट करतच असतात.
धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वी एक भावनिक पोस्ट केली होती. त्यात तिने नागपुरमधील तिच्या जुन्या घराच्या आठवणींना उजाळा दिला होता.
पण ताज्या पोस्टमध्ये, धनश्री वर्माने एक फोटोशूट पोस्ट केला आहे. त्यात तिने ग्रे कलरचा स्टायलिश वनपीस ड्रेस घातला आहे.
धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कायमच बोल्ड लूकमधील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांची वाहवा मिळवत असते.
तिच्या ताज्या फोटोशूटवर देखील तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून अनेकांनी पोस्ट रिशेअरही केल्यात.
सर्व फोटो सौजन्य- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम अकाऊंट (Dhanashree Verma Instagram )