लाल भडक, एकदम कडक... घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना धनश्री वर्माचं सुपरहॉट फोटोशूट (Photoshoot)

Yuzvendra Chahal Divorce Gossips, Dhanashree Verma Christmas Hot Photoshoot: चार दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवशी दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करणं टाळलं

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी प्रसिद्ध यूट्युबर व कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटांबाबत सध्या चर्चा सुरू आहेत.

कोरोना काळात या दोघांचे प्रेम जुळले. त्यानंतर काही महिन्यांतच, डिसेंबर २०२२ मध्ये युजी - धनश्री यांनी साखरपुडा आणि लग्नगाठ बांधली.

धनश्री - युजी यांची जोडी सुरुवातीपासूनच चर्चेत असायची. IPL असो किंवा भारतीय संघाचा क्रिकेटचा दौरा, धनश्री युजीसोबत कायम दिसायची.

गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी अचानक धनश्री युजी सोबत दौऱ्यांवर किंवा सामन्यांना दिसणे बंद झाले. तेव्हापासून त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या.

धनश्रीचे नाव दुसऱ्या एका भारतीय क्रिकेटरशी जोडून हेच दुराव्याचे कारण असल्याचे बोलले जात होते. पण ती पायाच्या दुखापतीमुळे विश्रांती घेत असल्याचे तिने स्पष्ट केले.

दोघांनी आपापल्या बाजूने या विषयावर बोलणं पूर्णपणे टाळले असले तरी चार दिवसांपूर्वी चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल एक महत्त्वाची हिंट मिळाली.

यंदाच्या २२ डिसेंबरला या दोघांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली. पण सोशल मीडियावर नेहमी अँक्टिव्ह असणाऱ्या दोघांनीही आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कुठलीच पोस्ट शेअर केली नाही.

या दोघांचा घटस्फोट झाला आहे, पण त्यांनी अद्याप ही बाब जाहीर केलेली नाही, असा दावा एका अभिनेत्याने केला आहे.

याच दरम्यान, धनश्री वर्मा लालभडक वन पीस डीपनेक ड्रेस घालून हॉट फोटोशूट केलं आहे. या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.