ती सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा बनलीये. तिनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली की, त्यावर चर्चा होणार नाही, असं होणारचं नाही. अनेकदा तिच्या लूक्सवर अन् खास अंदाजावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसून आले आहे.
पण, हल्ली तिची झलक दिसली की, बऱ्याचदा तिच्यासंदर्भात नकारात्मक कमेंट्स पाहायला मिळतात. ती ट्रोल होताना दिसते.
पुन्हा एकदा तिच्यावर तिच वेळ आल्याचे पाहायला मिळाले.
हा चेहा दुसरा तिसरा कोणी नसून ती आहे धनश्री वर्मा. क्रिकेटर युजवेंद्र चेहलपासून ती वेगळी होणार असल्याची गोष्ट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चेवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात धनश्रीला अनेकजण ट्रोल करताना दिसते.
चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत धनश्री वर्मा घराबाहेर स्पॉट झालीये. यावेळी तिने पापाराझींसाठी फोटो अन् व्हिडिओसाठी पोझ दिली.
याआधीच्या कडक लूकप्रमाणेच तिचा नवा लूकही एकदम कडक होता. त्यावर अनेकांनी लाइक्स कमेंट्सची बरसातही केली. पण यावेळी पुन्हा तिला ट्रोलचा सामना करावा लागला.
ब्लॅक आउट्सफिट; डोळ्यांवर काळा गॉगल या लूकवर एका नेटकऱ्याने धनश्री वर्माच्या सौंदर्यावर टिपण्णी करताना 'ओ माय गॉड अचानक एवढी सुंदर कशी दिसू लागलीये' अशी कमेंट केली. यावर एकानं तिला बदनाम करणारा रिप्लाय दिला. 'धोका' दिल्यामुळे अशा शब्दांत त्याने धनश्रीला ट्रोल केले.
चहलसोबतचं नातं तुटल्याच्या चर्चेत सातत्याने सोशल मीडियावर तिला अशा प्रकारे ट्रोल करण्यात येत आहे.