PHOTOS : भारताच्या सलामीच्या सामन्यात ग्लॅमरचा तडका; 'सारा' जमाना 'क्रिकेट' का दीवाना

भारताच्या घातक गोलंदाजीसमोर नवख्या आयर्लंडचा टिकाव लागला नाही.

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा थरार रंगला आहे. भारताने आयर्लंडविरूद्धच्या सामन्यातून आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली.

न्यूयॉर्कमध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी ब्लू आर्मी दिसली. चाहत्यांशिवाय युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील दिसली.

सारा तेंडुलकर आणि धनश्री वर्माने त्यांच्या सोशल मीडियावर याची झलक शेअर केली आहे.

रितीका सजदेह टीम इंडियाला चीअर करताना दिसली. तिचा पती रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण होताच रितीकाने एकच जल्लोष केला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या घातक गोलंदाजीसमोर नवख्या आयर्लंडचा टिकाव लागला नाही. १६ षटकांत अवघ्या ९६ धावांवर आयर्लंडचा संघ गारद झाला.

हार्दिक पांड्याने ३ बळी घेत भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. याशिवाय अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

आयर्लंडने दिलेल्या ९७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३७ चेंडूत ५२ धावा कुटल्या.

४ चौकार आणि ३ षटकार मारून रोहितने उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन केले. पण, दुखापतीमुळे भारतीय कर्णधाराला मैदान सोडावे लागले.

अखेर भारताने १२.२ षटकांत २ बाद ९७ धावा करून विजयी सलामी दिली. भारताचा पुढील सामना रविवारी पाकिस्तानसोबत होणार आहे.