Join us  

इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:48 PM

Open in App
1 / 8

पाकिस्तानविरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने ऐतिहासिक खेळीसह ७ बाद ८२३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

2 / 8

पाकिस्तानमध्ये पाहुण्या संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे हा आकडा एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणारा नक्कीच आहे. पण कसोटीच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या नाही.

3 / 8

इंग्लंडच्या संघाने मुल्तानच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध उभारलेली धावसंख्या कसोटीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावंसख्या आहे. यासह इंग्लंडनं कसोटीत सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या आघाडीच्या ५ संघाच्या यादीत तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे.

4 / 8

पण तुम्हाला माहितीये का? कसोटीत सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा श्रीलंकन संघाच्या नावे आहे. २ ऑगस्ट १९९७ मध्ये कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ६ बाद ९५२ धावांवर डाव घोषित केला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. जयसूर्यानं या सामन्यात ३४० धावांची खेळी साकारली होती.

5 / 8

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. २० ऑगस्ट १९३८ मध्ये इंग्लंडच्या संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात ७ बाद ९०३ धावांवर डाव घोषित केला होता. एवढेच नाही इंग्लंडच्या संघाने हा सामना ५७९ धावांनी जिंकला होता.

6 / 8

कसोटीत सर्वोच्च धावंसख्या उभारण्यात तिसऱ्या स्थानावरही इंग्लंडचा संघ आहे. १९३० मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंडच्या संघाने ८४९ धावा काढल्या होत्या. हा सामनाही अनिर्णित राहिला होता.

7 / 8

१९५८ मध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ३ बाद ७९० धावांवर डाव घोषित करत १७४ धावांनी विजय नोंदवला होता. ही कसोटी इतिहासातील पाचव्या क्रमांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

8 / 8

भारतीय संघ या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये चेन्नई कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड विरुद्ध ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित केला होता. केएल राहुलनं १९९ आणि करुण नायरनं या सान्यात ३०३ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा सामना ७५ धावांनी जिंकला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघश्रीलंकापाकिस्तानइंग्लंड