Join us  

तुम्हाला माहितीये का? टेस्टमध्ये फक्त या ६ फलंदाजांनीच बुमराहच्या गोलंदाजीवर मारलाय 'सिक्सर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 4:30 PM

1 / 10

जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील टॉप क्लास बॉलर आहे. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

2 / 10

अनेक फंलदाज तर त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे गडबडून जातात. त्यात यॉर्कर लेंथ चेंडू अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो.

3 / 10

कसोटी क्रिकेटमध्ये काही मोजकेच फलंदाज आहेत, जे बुमराहच्या गोलंदाजीवर सिक्सर मारण्यात यशस्वी ठरले आहेत. ही आकडेवारी तो टेस्टमधील बेस्ट बॉलर आहे, हे अधोरेखित करते.

4 / 10

एक नजर अशा ६ फलंदाजांवर ज्यांनी टेस्टमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर मारलाय षटकार

5 / 10

इंग्लंडचा बॅटर जोस बटलर या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर कसोटीत सर्वाधिक २ षटकार मारले आहेत.

6 / 10

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली हा देखील कसोटीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारला आहे.

7 / 10

दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॅटर एबी डिव्हिलियर्सच्या खात्यातही बुमराहविरुद्ध कसोटीत एका षटकाराची नोंद आहे.

8 / 10

कॅमरून ग्रीन हा अष्टपैलू खेळाडूही बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार मारणाऱ्या मोजक्या बॅटरपैकी एक आहे.

9 / 10

ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन हा तळाच्या फलंदाजीत उलटे सुलटे फटकेबाजी करून करण्यात माहिर आहे, त्यानेही बुमराहला कसोटीत एक षटकार मारला आहे.

10 / 10

इंग्लंडच्या ताफ्यातील फिरकीपटू आदिल राशिदच्या बॅटमधूनही बुमराहच्या गोलंदाजीवर एक षटकार आल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाजोस बटलर