भारतीय संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकने क्रिकबझशी संवाद साधताना म्हटले, "हर्षल आणि चहल यांना संधी मिळाली नाही म्हणून ते एकदाही रागावले नाहीत, ते खूप आत्मविश्वासी होते. स्पर्धेच्या सुरूवातीला त्यांना सांगण्यात आले की, इथे तुम्हाला खेळवले जाईल अन्यथा पुढे खेळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ते तयारी करत होते. युझवेंद्र चहलला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो सर्वोत्तम देण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही."