Join us  

Rishabh Pant Car Accident: थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ पंत आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 3:05 PM

Open in App
1 / 7

भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत याचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात तो बालंबाल बचावला. रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला तेव्हा त्याला पहिल्यांदा बस ड्रायव्हरने मदत केली होती. सुशील कुमार नावाच्या बस ड्रायव्हरने रक्तबंबाळ झालेल्या लंगडत लाचणाऱ्या रिषभला हात दिला. अॅम्बुलन्स बोलवून त्याला हॉस्पिटलला पाठविले. परंतू जेव्हा रिषभची कार डिव्हायरवरून पलिकडे कोसळली तेव्हाचा क्षण एवढा भयानक होता की त्या बस ड्रायव्हरने आशाच सोडलेली.

2 / 7

रिषभला मदत करणाऱ्यांचे क्रिकेटप्रेमी आभार मानत आहेत. रिषभची कार अपघातग्रस्त झाली तेव्हा रिषभ स्वत: विंड स्क्रीन तोडून कारच्या बाहेर आला. यानंतर कारला आग लागल्याचे त्याने सांगितले होते. आता बस चालकाने अपघात घडत असताना पाहिल्याचे सांगितले आहे.

3 / 7

सुशील कुमार हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. तो हरिद्वारहून येत होता. नारसनजवळ येताच दिल्लीवरून येणारी एक कार ६०-७० च्या वेगाने डिव्हायडरला आदळल्याचे त्याने पाहिले. डिव्हायडरवरून जंप करून ही कार पलिकडल्या रस्त्यावर आदळली व घसरू लागली होती, असे त्या ड्रायव्हरने सांगितले.

4 / 7

ही कार आमच्या बसच्या अगदी समोर आली. बसला आदळणार असे वाटत होते. आदळली तर आम्ही कोणाला वाचवू शकणार नाही, असा विचारही मनात आला. कारण कार आणि बसमध्ये ५० मीटरचे अंतर होते. तेवढ्याच अंतरात बस थांबवायची होती. तितक्यात मी सर्विस लाईनवरून बस पहिल्या लेनमध्ये नेली अन् कार दुसऱ्या लेनमधून मागे गेली. अर्जंट ब्रेक मारला आणि बस मधून उडी टाकून कारकडे धाव घेतली, असे सुशील कुमारने सांगितले.

5 / 7

कारमधून एक व्यक्ती रस्त्यावर पडला होता. अंगावर कपडे नव्हते. मला वाटले तो वाचण्याची शक्यता नाहीय. कारमधून स्पार्क होऊ लागले होते. आम्ही त्याला उचलले आणि कारपासून दूर नेले. कारमध्ये आणखी कोणी आहे का हे त्याला विचारले. तेव्हा त्याने मी एकटाच असल्याचे सांगितले.

6 / 7

तो म्हणाला मी रिषभ पंत आहे.... मी क्रिकेट फारसे पाहत नाही, यामुळे मला माहिती नव्हतो तो टीम इंडियाचा स्टार प्लेअर होता ते, आम्ही त्याला चादरीत लपेटले, असे सुशील कुमार म्हणाला.

7 / 7

त्यानेच आम्हाला तो क्रिकेटर असल्याचे सांगितले. तसेच माझे पैसेही पडल्याचे तो म्हणाला. आम्ही आजुबाजुचे ७-८ हजार रुपये गोळा केले आणि त्याला दिले. कंडक्टरने अॅम्बुलन्सला फोन केला मी पोलिसांना आणि नॅशनल हायवेला फोन केला. १५-२० मिनिटांत अॅम्बुलन्स आली आणि त्याला घेऊन गेली. आम्ही व्हिडीओ बनविला नाही, त्याचा जीव वाचविणे आमच्यासाठी महत्वाचे होते, असे सुशील कुमार म्हणाले.

टॅग्स :रिषभ पंतहरयाणा
Open in App