Join us

Multi Talented : तुम्हालाही माहीत नसेल या क्रिकेटपटूंचे अतरंगी प्रोफेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:51 IST

Open in App
1 / 10

महेंद्रसिंग धोनी - तिकीट कलेक्टर : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं खारगपूर रेल्वे स्थानकावर 2001 ते 2003 या कालावधीत तिकीट कलेक्टर म्हणून काम केले.

2 / 10

मिचेल जॉन्सन - प्लंबिंग कारचालक : ऑस्ट्रेलियाचा हा माजी दिग्गज गोलंदाज प्लंबिंग कारचालक होता. क्विन्सलँड क्रिकेट क्लबकडून करार न मिळाल्यानंतर जॉन्सननं उदरनिर्वाहासाठी काही काळ कार चालक म्हणून काम केले.

3 / 10

ऑब्रेय स्मिथ - अभिनेता : इंग्लंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूनं हॉलिवूड अभिनेता म्हणूनही काम केलं आहे. इंग्लंडसाठी त्यानं एक कसोटी सामनाही खेळला आहे. त्यांनी Elizabeth Taylor, Greta Garbo आणि Vivien Leigh या दिग्गज नटांसोबत त्यांनी काम केलं आहे. The Prisoner of Zenda, The Four Feathers, Dr. Jekyll and Mr. Hyde आणि Hitchcock’s Rebecca आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

4 / 10

नॅथन लियॉन - ग्राऊंड्समन : ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून ओळख होईल, असा विचारही नॅथन लियॉननं केला नसेल. अॅडलेड ओव्हलच्या ग्राऊंड स्टाफसोबत ट्रॅक्टर बॉय असलेल्या लियॉनला दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन बेरी यांनी हेरलं आणि त्यानंतर त्याचं आयुष्य पालटलं.

5 / 10

कॉलीन क्रॉफ्ट - वैमानिक : वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज कॉलीन क्रॉफ्ट यांनी 5 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 27 कसोटी सामन्यांत 125 विकेट्स घेतल्या. पण, निवृत्तीनंतर त्यांनी वैमानिक बनण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटपटू असताना फावल्या वेळेत ते air traffic controller म्हणूनही काम पाहिले.

6 / 10

एड्डो ब्रँडेस - शेतकरी : झिम्बाब्वेचे जलदगती गोलंदाज ब्रँडेस हे पोल्ट्री शेतकरी होते आणि त्यानंतर ते क्रिकेटपटू बनले.

7 / 10

ब्रँड हॉज - पेट्रोल पम्पवरील कर्मचारी : ऑस्ट्रेलियन संघाच्या तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू एकेकाळी पेट्रोल पम्पवर काम करायचा.

8 / 10

बिल वूडफुल - शिक्षक : ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वूडफुल हे निवृत्तीनंतर मेलबर्न हायस्कूलमध्ये गणिताचे शिक्षक होते. याच शाळेत ते शिकले होते आणि त्यानंतर ते याच शाळेचे मुख्याध्यापकही झाले.

9 / 10

शेन बाँड - पोलीस अधिकारी : न्यूझीलंडचा हा जलदगती गोलंदाज क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी पोलीस अधिकारी होता.

10 / 10

डब्लूजी ग्रेस - डॉक्टर : इंग्लंडच्या या दिग्गज क्रिकेटपटूंन वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले होते आणि क्रिकेट व्यतिरिक्त डॉक्टरी हा त्यांचा पेशा होता.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिजइंग्लंडझिम्बाब्वेन्यूझीलंड