Samaa TVMशी बोलताना तो म्हणाला,''क्रिकेटमध्ये अॅटीट्यूड फार महत्त्वाचा आहे. मी याचबाबत सतत बोलत आलोय. क्रिकेट खेळताना तुमच्याकडे अॅटीट्यूड आहे की नाही?. विराट कोहलीला कारकीर्दिच्या सुरुवातीला जगातील नंबर 1 फलंदाज बनायचे होते. तो आजही त्याच प्रेरणेने खेळतोय का?. हा खरा प्रश्न आहे. तो क्लास फलंदाज आहे, परंतु त्याला आता पुन्हा नंबर 1 बनावेसे वाटते का? किंवा त्याला असे वाटतेय की आयुष्यात सर्व काही अचिव्ह केलंय. आता फक्त रिलॅक्स राहायचे आणि वेळ घालवायचा? हे सर्व अॅटीट्यूडवर अवलंबून आहे.''