Join us  

Team India Hardik Pandya : “आता चार ओव्हर टाकतोय, पुढे कोणाला माहित..,” हार्दिक पांड्याबद्दल महम्मद अझरुद्दीननं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 9:07 AM

Open in App
1 / 9

Team India Hardik Pandya : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (Indian Premier League 2022) चॅम्पियन बनवले. कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पहिला आयपीएल हंगाम होता. याशिवाय अगदी नव्या फ्रेन्चायझीसाठी तो मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त प्रथमच खेळत होता.

2 / 9

हार्दिक देखील आयपीएल २०२२ पूर्वी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, अशा परिस्थितीत त्याच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा झाली होती. आयपीएल २०२२ च्या पहिल्याच सामन्यातील हार्दिकच्या कामगिरीने अनेक समीक्षकांना गप्पही केले. संपूर्ण सीझनमध्ये हार्दिकने बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली.

3 / 9

या सगळ्यात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची चिंता सतावत आहे. आतापर्यंत तो चार षटके टाकत आहे, परंतु किती वेळ कोणालाच माहिती नाही, असं तो म्हणाला.

4 / 9

“त्याच्यात क्षमता आहे, त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण दुखापतींमुळे तो संघात आणि बाहेर असतो. आता त्याने पुनरागमन केलेय, तो T20 क्रिकेटमधील चार षटकांचा कोटाही पूर्ण करत आहे, पण तो किती वेळ अशी गोलंदाजी करू शकतो, आम्हाला माहित नाही. पण एक मात्र नक्की की तो अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याने गोलंदाजी सुरू ठेवावी असे आम्हाला वाटते,” असे खलीज टाईम्सशी बोलताना अझहर म्हणाला.

5 / 9

आयपीएल फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अचानक सामना फिरवला. त्याने चार षटकांत तीन बळी घेतले आणि त्यानंतर ३४ धावांची खेळी खेळली. त्यांच्यात प्रतिभेची कमतरता नाही, फक्त सातत्य हवे असल्याचंही त्याने नमूद केले.

6 / 9

हार्दिकचे प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

7 / 9

भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. एका मुलाखतीत गावसकर म्हणाले, ‘हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत हे दोन असे खेळाडू आहेत जे ५-६ क्रमांकावर फलंदाजी करून १०० ते १२० धावा करू शकतात.

8 / 9

टी-२० विश्वचषक २०२१ मधील पराभवानंतर हार्दिक टीम इंडियाकडून खेळला नव्हता. आयपीएल २०२२मध्ये तो मैदानावर परतला. हार्दिकने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह फिटनेस आणि नेतृत्व गुणदेखील दाखवला.

9 / 9

टायटन्सकडून खेळताना हार्दिकने चौथ्या क्रमांकावर एक वेगळीच भूमिका पार पाडली. गोलंदाजीत काही सामन्यात त्याने मोहम्मद शमीसोबत सुरुवात केली. अर्थात आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघगुजरात टायटन्स
Open in App