किंग्स इलेव्हन पंजाब - कर्णधार ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म संघासाठी सुखावणारी बाब आहे. मनन व्होरा मार्क्स स्टोनिस व रिद्धिमान साहा यांच्याकडून फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरीची आशा.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार) युवराज सिंग दीपक हुड्डा आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानंतर आशीष नेहरा व मुस्तफिजुर रहमान छाप सोडण्यास सक्षम आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स - गौतम गंभीर(कर्णधार) सूर्यकुमार यादव रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे युसूफ पठाण उमेश यादव यांच्यावर संघाची भिस्त.
दिल्ली डेअरडेव्हिल्स - झहीर खान (कर्णधार) मोहम्मद शमी ख्रिस मॉरिस पॅट कमिन्स आणि कॅगिसो रबादा यांच्यावर संघाची भिस्त राहील. अमित मिश्रा ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो.
गुजरात लायन्स - सुरेश रैनासाठी (कर्णधार) हे महत्त्वाचे सत्र आहे. . संघाबाबत चर्चा करताना रवींद्र जडेजा संघात सहभागी होत नाही तोपर्यंत ड्वेन ब्राव्होला अष्टपैलूची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - कर्णधार विराट कोहली व स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दुखापतग्रस्त आहेत. आरसीबी संघाने शेन वॉटसनची प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स (आरपीएस) - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनची उणीव भासेल. सर्वांची नजर मात्र बेन स्टोक्सवर केंद्रित झालेली असेल. स्टोक्सला पुणे संघाने १४.५ कोटी रुपयांना करारबद्ध केले
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार) जोस बटलरची फलंदाजी व हरभजनसिंगचा अनुभव संघासाठी महत्त्वाची बाब आहे.
जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या थराराला आजपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने यंदाच्या आयपीएल तडक्याला सुरुवात होईल.