Join us  

Moeen Ali, ENG vs SA T20I : २० षटकार, ९ चौकार! इंग्लंडच्या फलंदाजांची आतषबाजी; मोईन अलीने झळकावले वेगवान अर्धशतक, मोडले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 7:54 AM

Open in App
1 / 8

England vs South Africa 1st T20I : वन डे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर यजमान इंग्लंडने आजपासून सुरू झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा चांगलाच समाचार घेतला. जेसन रॉय ( ८) सातत्याने अपयशी ठरत असला तरी इंग्लंडचे अन्य फलंदाज तुफान फॉर्मात दिसले.

2 / 8

जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) याला रोखणे अवघडच झाले आहे. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, त्याची आक्रमक स्टाईल कायमच दिसते. डेवीड मलाननेही चांगली फटकेबाजी केली. पण, आजच्या सामन्यात सप्राईज पॅकेज ठरला तो मोईन अली ( Moeen Ali) २ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करून तो वाऱ्यासारखा आला अन् वाऱ्यासारखाच परत गेला. पण, त्याने इंग्लंडकडून ट्वेंटी-२०त सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला.

3 / 8

कर्णधार जोस बटलर ( २२) याने ७ चेंडूंत वादळी खेळी करून तंबूची वाट धरली. डेवीड मलान व बेअरस्टो यांनी २ बाद ४१ वरून संघाची धावसंख्या ११२ धावांपर्यंत पोहोचवली. मलान २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला.

4 / 8

मोईन अलीने धावांचा पाऊस पाडला. अली व बेअरस्टो यांनी ११६ धावांची भागीदारी केली. अलीने १८ चेंडूत २ चौकार व ६ षटकार खेचून ५२ धावांची खेळी केली. बेअरस्टो ५३ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकारांसह ९० धावांवर माघारी परतला. इंग्लंडने ६ बाद २३४ धावा केल्या.

5 / 8

मोईन अली व जॉनी बेअरस्टो यांनी १७ व्या षटकात अँडील फेहलुक्वायोच्या षटकात ३३ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे महागडे षटक ठरले. यापूर्वी २०१२मध्ये आफ्रिकेच्या वेन पार्नेलच्या एका षटकात इंग्लंडने ३२ धावा चोपल्या होत्या.

6 / 8

मोईन अली हा इंग्लंडकडून ट्वेंटी-२०त सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. त्याने आज १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना लिएम लिव्हिंगस्टोन ( १७ चेंडू वि. पाकिस्तान, २०२१), इयॉन मॉर्गन ( २१ चेंडू वि. न्यूझीलंड, २०१९) यांचा विक्रम मोडला.

7 / 8

लुंगी एनगिडीने ३९ धावांत ५ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील नॉन-इंग्लंड गोलंदाजाकडून झालेली ही तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. पाकिस्तानचा उमर गुल ( ५-६ वि. न्यूझीलंड, २००९) व भारताचा कुलदीप यादव ( ५-२४ वि. इंग्लंड, २०१८) हे आघाडीवर आहेत.

8 / 8

इंग्लंडची घरच्या मैदानावरील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांनी आज ६ हाज २३४ धावा केल्या. इंग्लंडने २०१९मध्ये नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध ३ बाद २४१ धावा केल्या होत्या आणि ती त्यांची ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

टॅग्स :इंग्लंडद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट
Open in App