Join us  

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:15 PM

Open in App
1 / 10

15 मार्च 1877 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यात आला आणि त्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारली.

2 / 10

आतापर्यंत एकूण 4764 कसोटी सामने खेळले गेले आणि त्यात सर्वप्रथम हजार कसोटी सामने खेळण्याचा मान इंग्लंडनं पटकावला. इंग्लंडच्या नावावर 1022 कसोटी सामने आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया ( 830), वेस्ट इंडिज ( 545) आणि भारत ( 540) यांचा क्रमांक येतो.

3 / 10

इंग्लंडनं कसोटीत सर्वप्रथम 1000 सामने खेळण्याच्या विक्रमाबरोबर शुक्रवारी आणखी एक विक्रम नावावर केला. इंग्लंड सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे आणि त्यात त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.

4 / 10

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला आहे. इंग्लंडच्या नावावर 5 लाख 6 धावा झाल्या आहेत.

5 / 10

सर्वाधिक धावा करणाऱ्या कसोटी संघांमध्ये टीम इंडिया फार दूर नसली तरी त्यांच्या आणि इंग्लंड यांच्यातील धावांच फरक भरपूर आहे.

6 / 10

सर्वाधिक धावा करणाऱ्या कसोटी संघांत ऑस्ट्रेलिया 432706 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियानं 830 सामन्यांत या धावा केल्या आहेत.

7 / 10

या क्रमवारीत टीम इंडिया 273518 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, टीम इंडियानं 34.03 च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत, इंग्लंडची सरासरी ही 32.24 इतकी आहे.

8 / 10

वेस्ट इंडिजनं 545 कसोटी सामन्यांत 270441 धावा केल्या आहेत.

9 / 10

दक्षिण आफ्रिका 439 कसोटी सामन्यांत 216452 धावांसह या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.

10 / 10

त्यानंतर पाकिस्तान ( 209869), न्यूझीलंड ( 204172), श्रीलंका ( 145218) यांचा क्रमांक येतो.

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिकावेस्ट इंडिजपाकिस्तान