Join us  

WTC Final: न्यूझीलंडला कसोटी वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडची मदत; भारतातील पराभवाचा असा घेणार बदला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:06 AM

Open in App
1 / 10

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिलंवहिलं आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यासाठी कसून मेहनत घेत आहे. २०१७साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या हुकलेल्या संधीची कसर पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धा जिंकून भरून काढण्याचा टीम इंडियाचा ( Team India) प्रयत्न आहे.

2 / 10

लंडनच्या साऊदॅम्पट येथे १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत व न्यूझीलंड हे दोन तगडे संघ भिडणार आहेत. पण, भारताचा मुकाबला फक्त न्यूझीलंडशीच नसून यजमान इंग्लंडसोबतही त्यांना दोन दोन हात करावे लागणार आहेत. न्यूझीलंडला कसोटीचा वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडकडून मोठी मदत मिळणार आहे.

3 / 10

इंग्लंडच्या संघाला भारत दौऱ्यावर १-० अशा आघाडीनंतर टीम इंडियाकडून १-३ असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड आता न्यूझीलंडच्या मदतीला मैदानावर उतणार आहे.

4 / 10

भारतीय संघ बीसीसीआयच्या ठरलेल्या प्रवास नियोजनानुसार ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल होईल. त्यानंतर खेळाडूंना कोरोना नियमानुसार क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. पण, ३-४ दिवसानंतर खेळाडू आंतरसंघ तयार करून सराव करू शकतील.

5 / 10

भारतीय संघाला स्वतःच्याच खेळाडूंसोबत सराव करून कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये उतरावे लागणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडला इंग्लंड मदत करणार आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं मंगळावारी त्यासाठीचा प्लान जाहीर केला. ( England announces squad for the upcoming Test series against New Zealand)

6 / 10

न्यूझीलंडला कसोटी अजिंक्यपद फायलनपूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्यासाठी किवी संघ लंडनमध्ये दाखल झालाही आहे. ECBनं मंगळवारी दोन कसोटी सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला.

7 / 10

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना या मालिकेपासून दूर ठेवत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम कुरन आणि ख्रिस वोक्स हे खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाहीत.

8 / 10

यष्टिरक्षक फलंदाज जेम्स ब्राकली व गोलंदाज ऑली रॉबिन्सन यांना पदार्पणाची संधी मिळणार आहे. इंग्लंडच्या संघानं श्रीलंका दौऱ्यावर २-० असा दणदणीत विजय मिळवला, परंतु भारतात त्यांना ३-१अशी हार मानावी लागली. त्याचा वचपा काढण्याचा विचार इंग्लंडचा डोक्यात नक्की सुरू असेल.

9 / 10

इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना २ ते ६ जून या कालावधीत लॉर्ड्सवर, तर दुसरा १० त १४ जून या कालावधीत एडबस्टन येथे खेळवण्यात येईल. या मालिकेच्या माध्यमातून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठी जोरदार सराव होणार आहे.

10 / 10

इंग्लंडचा संघ - जो रूट, जेम्स अँडरसन, जेम्स ब्राकली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॅवली, बेन फोअक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, क्रेग ओव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, ऑली स्टोन, मार्क वूड

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध न्यूझीलंड