Join us  

England vs Pakistan 3rd Test : इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:15 AM

Open in App
1 / 10

England vs Pakistan 3rd Test : इंग्लंड दौऱ्यावर इतिहास घडवण्यासाठी दाखल झालेल्या पाकिस्तानच्या संघाची लाजीरवाणी अवस्था झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज फार काळ टिकले नाही. त्यात यजमानांच्या फलंदाजांनीही दमदार फटकेबाजी केली आणि तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली.

2 / 10

पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत चांगली सुरुवात करताना पहिल्या डावात आघाडी घेतली होती, परंतु तरीही त्यांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

3 / 10

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत पावसाचा खेळ अधिक रंगला आणि दोन्ही सामना अनिर्णित सुटले. पाकिस्तानचा संघ सर्वच आघाडीवर अपयशी ठरल्यानं त्यांचे माजी खेळाडूंकडून वस्त्रहरण होत आहे.

4 / 10

तिसऱ्या अन् शेवटच्या कसोटीत विजय मिळवून पाकिस्तानकडे मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी होती, परंतु त्यांनी तेथेही शस्त्र म्यान केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 583 धावांवर पहिला डाव घोषित केला. 22 वर्षीय झॅक क्रॅवलीनं पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.

5 / 10

क्रॅवलीनं 393 चेंडूंत 34 चौकार व 1 षटकार खेचून तब्बल 541 मिनिटं खेळपट्टीवर चिकटून बसला आणि 267 धावांची विक्रमी खेळी केली.

6 / 10

मालिकावीर जोस बटलरची त्याला दमदार साथ मिळाली. त्यानंही 311 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 152 धावा चोपल्या. ख्रिस वोक्सनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेताना 40 धावांची खेळी केली.

7 / 10

पाकिस्तानला हा भार पेलवला नाही आणि त्यांचा पहिला डाव 273 धावांवर गडगडला. कर्णधार अझर अली ( 141) आणि मोहम्मद रिझवान ( 53) यांचा अपवाद वगळले, तर पाकिस्तानचे सर्व फलंदाजांनी इंग्लंडसमोर लोटांगण घातले.

8 / 10

जेम्स अँडरसननं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कसोटीती पाच विकेट्स घेण्याची त्याची ही 29वी वेळ ठरली. त्याल स्टुअर्ट ब्रॉडची ( 2) साथ लाभली.

9 / 10

फॉलोऑन मिळालेल्या पाकिस्तानची दुसऱ्या डावातही तारांबळ उडाली. हा सामना पाकिस्तान डावाने पराभूत होईल, असेच चित्र होते. पण, पावसानं त्यांची इभ्रत वाचवली. अबीद अली (42), बाबर आझम ( 63*) यांनी संघर्ष केला.

10 / 10

पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. पाकिस्ताननं 4 बाद 187 धावा केल्या होत्या. या सामन्यात जेम्स अँडरसननं कर्णधार अझर अलीची विकेट घेत विक्रमाला गवसणी घातली.कसोटीत 600 विकेट्स घेणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे.

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानजेम्स अँडरसन