Cricket Buzz»फोटो गॅलरी »England vs West Indies 1st Test : कपिल देव, गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला बेन स्टोक्स, नोंदवला विक्रमEngland vs West Indies 1st Test : कपिल देव, गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला बेन स्टोक्स, नोंदवला विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:54 PMOpen in App1 / 12इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांचा कर्णधार बेन स्टोक्स यानं एक वेगळ्या विक्रमाची नोंद केली. या विक्रमासह त्यानं थेट कपिल देव, गॅरी सोबर्स या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान पटकावलं.2 / 12नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, विंडीज गोलंदाजांसमोर त्यांच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली.3 / 12विंडीज कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रीएल यांनी अनुक्रमे 6 व 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळला. बेन स्टोक्स ( 43) आणि जोस बटलर ( 35) यांनी संघर्ष केला.4 / 12वेस्ट इंडिजनं प्रत्युत्तरात 318 धावा करताना 114 धावांची आघाडी घेतली. क्रेग ब्रेथवेट ( 65), शेन डॉवरीच ( 61) आणि रोस्टन चेस ( 47) यांनी दमदार खेळ केला.5 / 12बेन स्टोक्सनं या सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला जेम्स अँडरसननं तीन विकेट घेत चांगली साथ दिली. स्टोक्सन या कामगिरीसह एक विक्रमाला गवसणी घातली.6 / 12त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 150 विकेट्स आणि 4000 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. हा दुहेरी विक्रम सर्वात करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यानं सहावं स्थान पटकावलं आहे.7 / 12कपिल देव यांनी 131 सामन्यांत 5248 धावा आणि 434 विकेट्स घेतल्या आहेत.8 / 12इंग्लंडचे इयान बॉथम यांनी 102 सामन्यांत 5200 धावा आणि 383 विकेट्स घेतल्या आहेत.9 / 12न्यूझीलंडचा डॅनिएल व्हिटोरी 113 सामने, 4531 धावा आणि 362 विकेट्स10 / 12दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस 166 सामने, 13289 धावा आणि 292 विकेट्स11 / 12वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स 93 सामने, 8032 धावा आणि 235 विकेट्स12 / 12बेन स्टोक्स 64 सामने, 4099 धावा आणि 150 विकेट्स आणखी वाचा Subscribe to Notifications