Cricket Buzz»फोटो गॅलरी »PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्नPHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 8:48 PMOpen in App1 / 8भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज करून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने प्रसिद्धी मिळवली होती. 2 / 8तेव्हापासून डॅनिएल क्रिकेट विश्वात ओळखीचा चेहरा बनली. आता तिने तिची प्रेयसी जॉर्जी हॉजसोबत लग्न केले आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 3 / 8काही वर्षांपूर्वी तिने विराट कोहली ( Virat Kohli) लग्नासाठी मागणी घातली होती आणि तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती. डॅनिएल वॅटने गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत विवाहगाठ बांधली.4 / 8हॉज ही महिला फुटबॉल संघाची व्यवस्थापक राहिली आहे. दोघीही खेळाशी संबंधित आहेत. 5 / 8२०१४ मध्ये वॅटने सोशल मीडियावर लिहिले होते, कोहली माझ्याशी लग्न कर... अशी पोस्ट लिहिली होती. आता १० वर्षांनंतर वॅटने लग्न केले. 6 / 8तिचा आणि कोहलीचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता. विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. 7 / 8डॅनिएल वॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. तिने २०१० मध्ये वन डे आणि ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 8 / 8तिने १०२ वन डे सामन्यांत १७७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १२९ धावा ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications