Cricket Buzz»फोटो गॅलरी »इंग्लंडचा बॅझबॉल गेम! न्यूझीलंड, पाकिस्तानला रडवले, आता ऑस्ट्रेलियाला चिरडणार; नेमका प्रकार कायइंग्लंडचा बॅझबॉल गेम! न्यूझीलंड, पाकिस्तानला रडवले, आता ऑस्ट्रेलियाला चिरडणार; नेमका प्रकार काय By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 9:56 AMOpen in App1 / 7टेस्ट क्रिकेटचे स्वरुप आता बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. टेस्ट क्रिकेट टुक टुक खेळण्याचे नाही तर दणादण फटके हाणण्याचे होण्याची शक्यता आहे. इंग्लंडने टेस्ट क्रिकेटचे स्वरुपच बदलण्याचे ठरविले आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने पहिल्याच दिवशी 393 रन्स ठोकून डाव घोषित केला आहे. टेस्ट क्रिकेटसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. 2 / 7टेस्ट क्रिकेट म्हणजे धैर्याचे काम असते. क्रीझवर पाय रोवण्यासाठी आणि चांगल्या चेंडूची वाट पाहण्यासाठी खेळाडू खेळत असतात. अनेकदा ४-५ ओव्हर झाल्या तरी केवळ १०-१२ रन्स बनविले जातात. जेव्हा विकेट पडायला सुरुवात होते तेव्हा संघ सावरण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा तर आणखी धावा कमी होणे अपेक्षित असते. परंतू, इंग्लंडने जे काही सुरु केले आहे ते टेस्ट क्रिकेटला घातकी आहे. 3 / 7टेस्ट क्रिकेटमध्ये आता बॅझबॉल गेमची एन्ट्री झाली आहे. यामुळे टेस्ट क्रिकेटची पूर्ण दशा आणि दिशा बदलण्याची शक्यता आहे. हा प्रकार इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या फ्युजनने झाला आहे. इंग्लंडने टी २० च्या अंदाजात टेस्ट क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. 4 / 7बैझबॉल गेममुळे टेस्ट क्रिकेट हाण की बडीव अशाच प्रकारचे होणार आहे. विकेट पडताहेत याची चिंता न करता फलंदाजांनी तुफानी बॅटिंग करायची असा याचा अर्थ आहे. गेल्या वर्षभरात इंग्लंडने सर्वच टेस्ट मॅचमध्ये ही रणनिती वापरली आहे. यामुळेच न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानचा त्यांनी धुव्वा उडविला आहे. 5 / 7जाणकारांच्या माहितीनुसार जेव्हापासून न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ब्रँडन मॅक्युलमने इंग्लंडचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे तेव्हापासून या बैझबॉलची एन्ट्री झाली आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लिश खेळाडूंनी टेस्टमध्ये देखील वेगाने रन्स बनविण्यास सुरुवात केली आहे आणि विजयही मिळविले आहेत. 6 / 7मॅक्युलम त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याचे टोपननाव बॅझ होते. यावरून इंग्लंड टीमने BazBall शब्द बनविला आणि त्याचा खेळ म्हणजे BazBall Game असे झाले आहे. 7 / 7मॅक्युलमनेच खेळाडूंना आक्रमक खेळण्याचे आदेश दिले आहेत. आक्रमक खेळल्याने आऊट होण्याची शक्यता असते. परंतू रनही वेगाने बनतात. यामुळे कमी वेळात जास्त रन्स बनले तर समोरच्या टीमवर दबावही वाढतो आणि टेस्ट निर्णायक अवस्थेत नेण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications