भलेही शतकांचे शतक होवो; पण सचिन तेंडुलकरचे 4 'विराट' विक्रम मोडू शकणार नाही 'किंग कोहली'...!

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यापासूनच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत होत आली आहे. मात्र केवळ तुलनाच नाही, तर त्याने स्वतःला तसे सिद्धही केले आहे.

विराट कोहली हा सध्याचा सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही अनेक विक्रम मोडले आहेत. महत्वाचे म्हणजे, यात सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वन डे शतकांचाही समावेश आहे. आता वन डेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम (50 शतक) विराट कोहलीच्या नावावर आहे. मात्र, विराटने सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडला, तरीही मास्टर ब्लास्टरच्या नावे असे 4 विक्रम आहेत, जे तो कधीही मोडू शकणार नाही.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यापासूनच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत होत आली आहे. मात्र केवळ तुलनाच नाही, तर त्याने स्वतःला तसे सिद्धही केले आहे. विराटने तेंडुलकरचा 49 वन डे शतकांचा विक्रम मोडला आहे. ही काही साधी गोष्ट नाही.

महत्वाचे म्हणजे, त्याने गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान सचिन समोरच हा पराक्रम केला. आता कोहली हा जगातील सर्वाधिक 50 वन डे शतक झळकावणारा फलंदाज जझाला आहे. आता त्याचे लक्ष्य जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रिय शतकांचा विक्रम मोडणे असेल. कोहलीने आतापर्यंत 80 शतके ठोकली आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या नावे सर्वाधिक 100 शतकांची नोंद आहे.

सचिनच्या नावावर सर्वाधिक टेस्ट खेळण्याचा विक्रम - सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वाधिक कसोटी सामने खेळलेला फलंदाज आहे. त्याच्या नावे 200 कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे विराटसाठी अत्यंत कठीण गोष्ट आहे. विराटने आतापर्यंत केवळ 113 कसोटी सामने खेळले आहेत. हा विक्रम मोडायचा असेल तर त्याला आणखी बरेच वर्ष या फॉरमॅटमध्ये खेळावे लागेल, जे अशक्य वाटते.

टेस्टमध्ये सर्वाधिक धावांचा विश्व विक्रम - कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 15971 धावा केल्या आहेत. विराट कोहली हा विक्रम मोडू शकेल, असे वाटत नाही. कारण विराट कोहली अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावाही पूर्ण करू शकलेला नाही. विराटच्या नावावर 8873 धावा आहेत. तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला आणखी 7000 हून अधिक धावांची आवश्यकता आहे. जे शक्य वाटत नाही.

दीर्घ वनडे करिअर - सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक काळ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटर आहे. 18 डिसेंबर 1989 रोजी पदार्पण करणाऱ्या या महान फलंदाजाने 18 मार्च 2012 रोजी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. सचिन एकूण 22 वर्षे 91 दिवस या फॉरमॅटमध्ये सक्रिय होता.

सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणे विराट कोहलीसाठी सोपे नाही. 18 ऑगस्ट 2008 रोजी कोहलीने ODI फॉरमॅटमध्ये पदार्पन केले. त्याला 15 वर्षे 93 दिवस झाले आहेत. सचिनला मागे टाकण्यासाठी त्याला 2030 पर्यंत या फॉरमॅटमध्ये खेळावे लागेल, जे शक्य वाटत नाही.

सर्वाधिक वन डे विश्वचषक - सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वाधिक एकदिवसीय विश्वचषक खेळणारा क्रिकेटर आहे. त्याने 1992 ते 2011 पर्यंत 6 एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत. विराटसाठी त्याचा हा विक्रम मोडणेही अशक्य वाटते. कारण विराट 2011 पासून आतापर्यंत 4 वनडे वर्ल्डकप खेळला आहे. सचिनची बरोबरी साधण्यासाठीही त्याला 2027 आणि 2031 चा एकदिवसीय विश्वचषक खेळावा लागेल, जे कठीन दिसते.

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली...