Cricket Buzz»फोटो गॅलरी »क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या जोड्याक्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या गाजलेल्या जोड्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 12:20 PMOpen in App1 / 8नव्वदच्या दशकातील अभिनेत्री फरहीन खानने ऑल राऊंड क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत 1997 मध्ये लग्न केलं. फरहीनचे जान तेरे नाम, सैनिक यासारखे सिनेमे गाजले आहेत.2 / 8वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार विव रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. नीना गुप्ता यांना विवपासून मसाबा ही मुलगी आहे. मात्र विव विवाहित असल्यामुळे नीनासोबत त्याचं लग्न झालंच नाही. 2008 मध्ये दिल्लीचा सीए विवेक मेहरासोबत अखेर नीना गुप्ताने लग्नगाठ बांधली.3 / 8अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 27 डिसेंबर 1969 रोजी तत्कालीन सर्वात तरुण कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्नगाठ बांधली. हा बॉलिवूड आणि क्रिकेटला जोडणारा कदाचित पहिलाच विवाह होता4 / 8माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री संगीता बिजलानीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केलं. पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिल्यानंतर 1996 मध्ये संगीता-अझर विवाहबद्ध झाले. नौरीनपासून अझरला दोन मुलंही होती. अझर मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकल्यानंतर दोघं वेगळे झाले.5 / 8क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांची ओळख आयपीएलमध्ये कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर 29 ऑक्टोबर 2015 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले6 / 8सलमान खानच्या बॉडीगार्डमध्ये झळकलेली ब्रिटीश अभिनेत्री हेझल कीच 30 नोव्हेंबर 2016 रोजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत विवाहबद्ध झाली.7 / 8अभिनेत्री सागरिका घाटगे 23 नोव्हेंबर 2017 रोजी माजी क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्नबंधनात अडकली. 2014 मध्ये झहीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.8 / 8भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर काल विवाहबंधनात अडकले. आणखी वाचा Subscribe to Notifications