टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर कप्तान रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर टीम इंडियाचा नवा कप्तान कोण असेल यावर बरीच नावे पुढे आली होती. यात अगदी कालपर्यंत हार्दिक पांड्याचे नाव पहिले होते. परंतू अचानक असे काय घडले की सूर्यकुमार भारताचा टी २० टीमचा कप्तान बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
टी २० साठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहेत. परंतू मीडिया रिपोर्टनुसार आणि सूर्यकुमारच्या इन्स्टा पोस्टनुसार पांड्या ऐवजी सूर्यकुमारलाच कप्तानपद दिले जाण्याची चर्चा आहे. खराब फिटनेसचे लांबलचक रेकॉर्ड आणि हार्दिक पांड्याचे वागणे त्यांच्या नेतृत्वगुणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून यामागे मुंबईकर रोहित शर्माचीच खेळी असल्याचे देखील बोलले जात आहे.
सुत्रांनुसार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्माला हार्दिक पांड्या कप्तान म्हणून नकोय तर सूर्यकुमार हवा आहे. गंभीर आणि मुख्य निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर याने याबाबत पांड्याला कल्पनाही दिली आहे. येत्या २७ जुलैपासून श्रीलंकेसोबत होणाऱ्या मालिकेसाठीच फक्त सूर्या कप्तानी करणार नसून पुढील टी २० सामने, विश्वचषक २०२६ पर्यंत कप्तान राहणार असल्याचे वृत्त येत आहे.
नुकताच झालेला वर्ल्डकप हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार या दोघांनी जिंकवून दिला असला तरी हार्दिकचे टी २० रेकॉर्ड काही खास नाहीय. हार्दिक २०१५ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. या संघाकडून त्याने आतापर्य्त १०६ मॅच खेळल्या आहेत. यात केवळ १६९२ रन्स बनविले असून केवळ चार अर्धशतक नावावर आहेत.
गुजरातसाठी खेळताना ३१ सामने खेळले आहेत, ८३३ रन आणि सहा अर्धशतक नावावर आहेत. एकूण 137 मॅचमध्ये त्याने ६४ विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक कप्तान म्हणून कसे वागला आणि कसा ट्रोल झाला हे सर्वांनाच माहिती आहे.
दुसरीकडे सूर्याच्या खेळाकडे लक्ष घातले तर त्याने 2021 मध्ये डेब्यू केला होता. आतापर्यंत त्याने 68 मॅचमध्ये 2340 रन्स केले आहेत. यात चार शतकही आहेत. कप्तान म्हणून त्याने टीम इंडियाचे सातवेळा नेतृत्व केले आहे, यापैकी पाच सामने जिंकेल आहेत.
आयपीएलच्या 150 मॅचमध्ये सूर्याने 3594 रन्स चोपले आहेत. दोन्ही खेळाडूंचा प्रदीर्घ अनुभव रोहितच्या गाठीशी असल्याने व आयपीएल मधील पांड्याचे मीच बॉलिंग करणार आणि मीच बॅटींग करणारच्या हेकेखोरपणामुळे रोहितने सूर्यासाठी गंभीरला मनविले आहे. या साऱ्यातूनच पांड्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेल्या सूर्याला कप्तानपदासाठी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.