Cricket Buzz»फोटो गॅलरी »Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चाFact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा By स्वदेश घाणेकर | Published: January 30, 2021 9:17 AMOpen in App1 / 9ट्वेंटी-20 क्रिकेटमधील स्टार फलंदाज किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याच्याशी निगडीत कोणतीही बातमी हवा करून जाते. मग मैदानावरील त्याची स्फोटक खेळी असो किंवा अन्य कोणतीही... 2 / 9गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या पोलार्डचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. गतवर्षी यूएईत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लिगच्या ( IPL 2020) १३ व्या पर्वात मुंबई इंडियन्सला जेतेपद जिंकून देण्यात पोलार्डचा मोठा वाटा होता. त्यानं २-३ सामने तर प्रतिस्पर्धी संघाच्या हातचे हिरावून आणले.3 / 9पोलार्ड जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करतो. त्यानं ५३१ ट्वेंटी-20 सामन्यांत १०५७८ धावा केल्या आहेत. ख्रिस गेल ( १३५८४) याच्यानंतर ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करण्याचा मान पोलार्डला जातो.4 / 9मुंबई इंडियन्सकडून १५० सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्यानं १६४ सामन्यांत ३०२३ धावा चोपल्या आहेत आणि ६० विकेट्सही घेतल्या आहेत.5 / 9सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर पोलार्डच्या मृत्यूची चर्चा रंगली होती. गाडीच्या भीषण अपघातात पोलार्डचा मृत्यू झाल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यामुळे चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले. 6 / 9वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची चर्चा काल दिवसभर सोशल मीडियावर रंगली. या अपघातात पोलार्डला आपले प्राण गमवावे लागले असल्याचा दावाही अनेकांनी केला आहे. 7 / 9सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही चर्चा चुकीची असून अपघात झालेल्या गाडीचा आणि पोलार्डचा काहीच संबंध नाही. ही सर्व अफवा आहे.8 / 9विंडीजचा अष्टपैलू खेळाडू सध्या यूएईल T10 लीगसाठी दाखल झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हा पोलार्ड डेक्कन ग्लॅडिएटर संघाकडून पुणे डेव्हिल्सविरुद्ध मैदानावर उतरला होता. 9 / 9पोलार्डच्या ग्लॅडिएटर संघानं हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. अशा एखाद्या खेळाडूच्या मृत्यूची बातमी प्रथमच सोशल मीडियावर रंगली नाही. यापूर्वीही भारताचा स्टार अष्टपैलू सुरेश रैना याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications