Join us

रिषभ पंत अन् उर्वशी रौतेला यांची पुन्हा चर्चा; अभिनेत्रीच्या उत्तरानं सारेच हैराण, जाणून घ्या नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 12:18 IST

Open in App
1 / 9

क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांची नाव नेहमी जोडली जातात. मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर, झहीर खान-सागरिका घाटगे, विराट कोहली-अनुष्का शर्मा, हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिच इत्यादी अनेक उदाहरणं दिली जाऊ शकतात. त्यात क्रिकेटपटू व बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअर्सच्याही चर्चा रंगत असतात.

2 / 9

रिषभ पंत ( Rishabh Pant) व उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या नावाची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. एक काळ असा होता की दोघांच्या अफेअर्सचीच चर्चा सर्वांच्या तोंडावर होती. पण, या दोघांनी कधीच या नात्याबाबत जाहीररित्या मत व्यक्त केलं नाही.

3 / 9

रिषभचे नाव हार्दिकची कथित Ex गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याशी जोडलं गेलं होतं. रिषभ व ती अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, रिषभनं या चर्चांना कंटाळून त्या अभिनेत्रीला WhatsApp वर ब्लॉक केल्याचे वृत्त होते.

4 / 9

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान रिषभ आणि ती अभिनेत्री मुंबईच्या एका हॉटेलमध्ये सोबत डिनर करताना पाहिले गेले होते. त्यानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, रिषभनं नववर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर प्रेयसी इशा नेगीसोबतचे फोटो शेअर करताना त्या चर्चांना पूर्णविराम लावला.

5 / 9

त्यात आता एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर उर्वशीनं दिलेलं उत्तर पाहून सर्वच हैराण झाले. तू सर्वात जास्त कोणता क्रिकेटपटू आवडतो?, यावर उर्वशी म्हणाली,''मी क्रिकेट अजिबात पाहत नाही आणि त्यामुळे मी कोणत्याही क्रिकेटपटूला ओळखत नाही. पण, मी सचिन सर आणि विराट सर यांचा खूप आदर करते.''

6 / 9

तिच्या या उत्तरानंतर नेटिझन्सनी तिची फिरकी घेण्या सुरुवात केली आहे.

7 / 9

8 / 9

9 / 9

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेला