Join us  

सर्वांत जलद अर्धशतक यशस्वीच्या नावावर; यादीत टॉप ५मधील ३ खेळाडू केकेआरकडून खेळलेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 3:03 PM

Open in App
1 / 6

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्या चेंडूपासून चढवलेला हल्ला अखेरपर्यंत कायम राखत राजस्थान रॉयल्सला एकहाती विजय मिळवून देणारा ठरला. त्याने आयपीएल इतिहासातील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावत कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांची पिसे काढली.

2 / 6

केकेआरविरुद्ध २१ वर्षीय यशस्वीनं अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. यशस्वीने ४७ चेंडूत ९८ धावा केल्या. या खेळीत १३ चौकार आणि ५ षटकार लगावले.

3 / 6

आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार असताना केएल राहुलने १४ चेंडूत अर्धशतक केलं होतं. राहुल १६ चेंडूत ५१ धावा करत बाद झाला होता.

4 / 6

या यादीत तिसऱ्या नंबरवर पॅट कमिन्सचं नाव आहे. कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी कमिन्स कोलकाता नाइट राइडर्स संघाकडून खेळत होता. या सामन्यात कमिन्सने १५ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या.

5 / 6

चौथ्या नंबरवर यूसुफ पठाण याच्या नावाचा समावेश आहे. कोलकाता संघाकडून खेळताना यूसुफ पठाणने सनराइस हैदराबादविरुद्ध २०१४ साली १५ चेंडून अर्धशतक केले होते. या सामन्यात त्याने २२ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या.

6 / 6

पाचव्या नंबरवर देखील कोलकाता संघाच्या खेळाडूचं नाव आहे. ते म्हणजे सुनिल नारायण...सुनिल नारायणने २०१७ साली कोलकाताकडून खेळताना १५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. यावेळी नारायण १७ चेंडूत ५४ धावा करत बाद झाला होता.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सलोकेश राहुल
Open in App