Cricket Buzz»फोटो गॅलरी »'वधूपिता' शाहिद आफ्रिदी गहिवरला! लेक सासरी जाताना म्हणाला- "मेरी प्यारी बेटी..."'वधूपिता' शाहिद आफ्रिदी गहिवरला! लेक सासरी जाताना म्हणाला- "मेरी प्यारी बेटी..." By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 12:44 PMOpen in App1 / 6Shahid Afridi Emotional at Daughter Wedding: पाकिस्तानचा स्टार फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत पाकिस्तानी खेळाडूंची गर्दी पाहायला मिळाली. माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्या लेकीशी, अक्सा हिच्याशी शाहीन शाह आफ्रिदीने लग्नगाठ बांधली.2 / 623 वर्षीय शाहीन शाह आफ्रिदीने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न केले होते. यानंतर पाक टीमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रिसेप्शन पार्टी पुढे ढकलली जात होती.3 / 6आता श्रीलंका दौऱ्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला काही काळ विश्रांती मिळाली. त्यावेळी स्टार क्रिकेटरने त्याच्या लग्नासाठी ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत पाकिस्तानातील सर्व प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.4 / 67 जुलै रोजी झालेल्या या भव्य पार्टीत बाबर आझमपासून मोहम्मद रिझवानपर्यंत अनेक खेळाडू वेगळ्या अंदाजात दिसले. यावेळी वधूपिता शाहिद आफ्रिदी मात्र या वेळी थोडासा भावनिक झाल्याचा दिसला.5 / 6सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याने आपली भावना मांडली. 'माझ्या प्रिय मुली- असे वाटते की मी कालच तुझे चिमुकले हात हाती घेतले होते. त्यावेळेस मी तुला माझ्या हातात धरले होते आणि त्या दिवशी मी स्वतःला वचन दिले होते की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही.'6 / 6'तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार असलात तरी मी नेहमीच तुमच्यासोबत असेन. मी ती व्यक्ती आहे जिने तुझ्यावर सर्वप्रथम प्रेम केले. अल्लाह तुम्हा दोघांनाही सुखी ठेवो आणि तुम्हाला एकत्र सुंदर आयुष्य घडवण्याची संधी देवो. आमिन,' असेही आफ्रिदीने लिहिले. आणखी वाचा Subscribe to Notifications